माजरी जावेद शेख :
जिल्हा परिषद मराठी शाळा, माजरी खदान येथे झालेल्या चोरीचा माजरी पोलीसांनी केवळ १२ तासांत छडा लावत पर्दाफाश केला आहे. शाळेतील कार्यालयातून चोरी गेलेला अॅसर कंपनीचा अंदाजे ३०,००० रुपयांचा लॅपटॉप पाच अल्पवयीन आरोपींकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
School theft solved in 12 hours, five minors arrested — laptop worth Rs 30,000 seized 🚨*
दिनांक १७/११/२०२५ रोजी शाळेचे शिक्षक यशवंत दत्तु महाले (वय ५२) यांनी माजरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, शाळेच्या कार्यालयाचा लोखंडी दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला होता.
शासकीय कार्यालयातील चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा क्रमांक ९५/२०२५ अन्वये पोलीसांनी तत्काळ तपास सुरू केला.
मा. ठाणेदार यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने शिताफीने तपास करून पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्या कबुलीजबाबावरून चोरीतील लॅपटॉप जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा श्री. संतोष बाकल यांच्या सुपरव्हिजनमध्ये करण्यात आली.
कारवाईत सपोनि. अमितकुमार पांंडेय, पोउपनि. हरीदास चोपन, सफौ. रमेश तुरानकर, पो.अं. अनिस शेख, पो.अं. प्रमोद मिलमिले, पो.अं. रविन्द्र कन्नाके (पोस्टे माजरी) यांचे मोलाचे योगदान राहिले.
0 comments:
Post a Comment