राजुरा (प्रतिनिधी) –राजुरा तालुक्यातील खामोना येथील एका व्यक्तीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता सागवान प्रजातीच्या वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.Illegal teak tree Cutting
या प्रकरणाची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित व्यक्तीवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याबाबत वनविभागाला लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. वनविभागाकडून या प्रकरणावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था या प्रकरणात पुढाकार घेणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.
0 comments:
Post a Comment