जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत पावणा रै. व काढोली येथे “जल अर्पण दिवस” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गावात पाण्याचे योग्य व्यवस्थापन, सुरक्षित साठवण आणि बचत यांद्वारे मुबलक व सुरक्षित पाणीपुरवठा साध्य होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रमुख उद्घाटक मच्छिंद्रनाथ धस (प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन, जिल्हा परिषद चंद्रपूर) यांनी मार्गदर्शन करताना केले.'Water Offering Day' celebrated with enthusiasm in Bhadravati taluka*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशुतोष सपकाळ (गटविकास अधिकारी, पंचायत समिती भद्रावती) होते. सहउद्घाटक म्हणून सुमित बेलपत्रे (कार्यकारी अभियंता, जि. प. चंद्रपूर) उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओमकेश दराडे (उपअभियंता, ग्रा. पा. पू., भद्रावती) व सहाय्यक गटविकास अधिकारी बंडू आकनूरवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एकनाथ घागी (माजी सरपंच), प्रदीप हरिदास घागी (माजी सरपंच, पावणा रै.), आश्विन पेटकर (ग्रामपंचायत अधिकारी, पावणा रै.), वर्षा घागी (पोलीस पाटील), स्वच्छ भारत मिशन, जि. प. चंद्रपूरचे मनुष्यबळ विकास सल्लागार ,बंडू हिरवे, माहिती-शिक्षण-संवाद तज्ञ ,कृष्णकांत खानझोडे, प्रवीण खंडारे, समूह समन्वयक श्री. श्रीराम थुल व स्वच्छ भारत मिशनचे अभियंता , आदित्य मस्कावार तसेच ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली. त्यानंतर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन, जल कलशपूजन, कलापथकाचे सादरीकरण, पाच महिलांच्या सहभागातून रासायनिक पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक असे उपक्रम पार पडले. जि. प. शाळेत विद्यार्थ्यांसाठी पाणी व स्वच्छता विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक प्रभाकर वाकडे यांनी केले. प्रास्ताविक ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता ,ओमकेश दराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. सपना पुरमशेट्टीवार (गट समन्वयक, प. स. भद्रावती) यांनी केले.
पाणी संवर्धन व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
0 comments:
Post a Comment