भद्रवती /जावेद शेख : श्रीक्षेत्र भांदेवाडा येथे विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा जन्मोत्सव सोहळा व रामनवमी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दिनांक 19 मार्च 2026, गुरुवार (गुढीपाडवा) पासून 26 मार्च 2026, गुरुवार (रामनवमी) पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 9.16 वाजता सद्गुरूबंधू श्री वसंतराव झोलबाजी धानोरकर यांच्या हस्ते घटस्थापना व गुढी उभारून होणार आहे.Shri Jagannath Baba Janmotsav celebration at Bhandewada
उत्सवादरम्यान दररोज सकाळी काकडा, श्रीमद् भागवत कथा तसेच जगन्नाथ बाबा चरित्राचे प्रवचन ह.भ.प. श्री प्रशांत महाराज भोयर (झरी जामणी) यांच्या ओजस्वी वाणीतून सादर केले जाणार आहे. तसेच दररोज सायंकाळी हरिपाठ व त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, अखंड वीणावादन आणि ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजनही करण्यात आले आहे.
रामनवमीच्या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी बाबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता जगन्नाथ बाबा जन्मोत्सव, त्यानंतर काल्याचे कीर्तन व दहीहंडी कार्यक्रम होणार आहे. शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment