Ads

भद्रावतीत अवैध रेती तस्करांवर महसूल विभागाची ‘धडक’ कारवाई

भद्रावती (प्रतिनिधी – जावेद शेख) :
भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना प्रत्युत्तर देत महसूल विभागाने १७ मार्च २०२६ रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास मौजा गौराळा परिसरात धडक कारवाई केली.Revenue Department Launches 'Crackdown' on Illegal Sand Smugglers in Bhadravati
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा चिरादेवी नाल्यातून विनापरवाना रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर सुमठाणा गावाजवळ जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी वरोरा संदीप भस्के यांनी स्वतः उपस्थित राहून केल्याचे सांगितले जात आहे.
कारवाईदरम्यान गवराळा (भद्रावती) येथील रितेश बुचे यांचा ट्रॅक्टर अवैधरित्या रेती वाहतूक करताना आढळून आला. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या कारवाईसाठी ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक यांना पाचारण करण्यात आले होते. जप्त ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान, दुसरीकडे मांगली (रै) नाल्यासह चारगाव घाट, कोंडा नाला, चंदनखेडा, पारोधी घाट, वाघेडा व चोरा परिसरात रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरची ये-जा सुरू असल्याच्या चर्चा स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, काही ठिकाणी कारवाई होत असताना इतर भागांमध्ये अवैध रेती वाहतूक अद्याप सुरूच कशी आहे?
तसेच, रात्री व दिवसभर सुरू असलेल्या ट्रॅक्टर हालचालींचा नेमका प्रकार काय, याबाबत विविध माहिती समोर येत असून या प्रकरणाचा पुढील भाग लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment