जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी,
पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंदनखेडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली ताडोबा सफारी चला माझ्या ताडोबाला या उपक्रमांतर्गत निसर्ग शिक्षणातून व संवर्धन या उद्देशाने चंदनखेडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी ताडोबा सफारी केली. "Come to My Tadoba"—Forest Conservation through Nature Education.
चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारी करताना विद्यार्थ्यांना विविध वन्यजीव वनस्पती जंगल संवर्धन याबाबत माहिती घेतली ताडोबा मधील विविध प्रकारचे हरीण सांबर, चितळ ,निलगाय ,मोर ,वाघ इत्यादी विविध प्रकारचे पशुपक्षी इत्यादी बघितले दुपारी बारा वाजता ताडोबा सफारीसाठी शासनाची गाडी शाळेत आली .मोफत शासकीय वाहनाने विद्यार्थी शिक्षक यांनी ताडोबा सफारी केली ताडोबा सफारीसाठी वाहक संदीप पाटील व राकेश कराडे यांनी विशेष सहकार्य केले ताडोबा सफारीसाठी ताडोबा शिक्षणाधिकारी सौ.राजेश्वरी दयालवार यांनी ताडोबा येथील प्राण्याबद्दल सविस्तर माहिती दिली ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत ताडोबा सफारी मिळत असल्याने वन विभागाचा एक स्तुत्य उपक्रम आहे या ताडोबा सफारी मध्ये 40 विद्यार्थी मुख्याध्यापिकाअनिता आईंचवार सहाय्यक शिक्षिका कविता हनवते व सहाय्यक शिक्षक दिनेश उईके यांचा समावेश होता.
0 comments:
Post a Comment