Ads

सन्नी वाईन बार ची परवानगी रद्द करावी

राजुरा, ता.प्र. -
राजुरा तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या सन्नी वाईन बार असलेल्या इमारतीचे सर्व मालकी हक्क असलेल्यांची परवानगी नसतांनाही तिथे बिनदिक्कत पणे वाईन बार सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही उत्पाद शुल्क विभागाकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात असून या बारमालकाला अभय तर देत आहेच, शिवाय कागदपत्रांची पुर्तता न करता सतत नविन वर्षाकरीता परवानगी देत आहे. त्यामुळे सन्नी वाईन बार ची आमच्या जागेवरील परवानगी रद्द करावी आणि आता नविन २०२६-२७ मध्ये या वर्षाचे नूतनीकरण करू नये, अशी मागणी या मालमत्तेेचे वारसा हक्क असलेले मालक सचिन जगन्नाथराव चन्ने यांनी दिनांक २९ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
The license for Sunny Wine Bar should be revoked.
               कौशल्याबाई जगन्नाथ चन्ने यांच्या मालकीची रामपूर येथे मालमत्ता क्रमांक ७६४ ही इमारत आहे. कौशल्याबाई यांचे निधन दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी झाले. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांची भाऊराव, संतोष व सचिन ही तिन मुले आणि सुनिता खामनकर, वैशाली झोरे व इंदिरा सावरकर या तिन मुलींची नावे वारसाहक्काने कब्जेदार व मालक म्हणून नोंदवण्यात आली. त्यामुळे या सर्वांचा या मालमत्तेत सामायिक अधिकार आहे आणि याची सातबारावर नोंद असून वारसा प्रमाणपत्रात सुध्दा नोंद आहे. सन्नी वाईन बार व रेस्टॉरंट यांची अनुज्ञाप्ती क्रमांक एफएल - ३ क्रमांक १८५ असून ती संतोष जगन्नाथ चन्ने यांचे नावे आहे. मात्र ज्या इमारतीत हे बार सुरू आहे, त्या इमारतीचे सचिन व भाऊराव हे दोघेही सहमालक व सहकब्जेदार आहेत. मात्र त्यांची संमती नसतांना आणि परवानगी न घेता गेल्या पाच वर्षापासून या बारला बिनदिक्कतपणे परवानगी मिळत आहे. वास्तविक दरवर्षी या बारची अनुज्ञप्ती नूतनीकरण करावे लागते आणि नव्याने कागदपत्रे सादर करावे लागतात. मात्र सन्नी वाईन बारचे बाबत राज्य उत्पाद शुल्क विभाग जुन्याच कागदपत्रांचे आधारावर परवानगी देत आहे.
              याबाबत सचिन व भाऊराव चन्ने यांनी संयुक्तपणे उत्पाद शुल्क विभागाकडे रितसर तक्रार केली. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर जिल्हा अधिक्षक नितीन धार्मिक यांनी सचिन व भाऊराव चन्ने यांचा अर्ज फेटाळून लावला. 
               याच प्रकारे संतोष जगन्नाथ चन्ने यांनी सामायिक प्राॅपर्टी असलेल्या व भाऊराव चन्ने यांच्या सचिन वाईन बार ची तक्रार केली. त्यावर उत्पादन शुल्क विभागाने तातडीने मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सुनावणी घेऊन त्या बार ची परवानगी रद्द केली. त्याचप्रमाणे सचिन चन्ने यांच्या सीएल ३ या मे. चन्ने देशी दारू दुकान याची तक्रार संतोष चन्ने व तिन बहिणींनी केली होती. यावर तातडीने निर्णय घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे सुनावणी घेण्यात आली आणि नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हेही दुकान बंद केले. मात्र अगदी तशीच तक्रार सचिन चन्ने व भाऊराव चन्ने यांनी सन्नी वाईन बार बाबत उत्पादन शुल्क विभागाकडे केली. त्यांनी या दोन्ही भावांचे बयाण घेतले, मात्र त्यानंतर रितसर सुनावणी न घेता एकतर्फी निकाल देत सचिन व भाऊराव चन्ने या बंधूंचा अर्ज निकाली काढला. राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांनी याबाबत मोठा अजब आदेश दिला आहे. संतोष चन्ने यांच्या तक्रारीवरून ताबडतोब कारवाई करीत मे. चन्ने देशी दारू दुकान आणि सचिन वाईन बार या दोन्ही आस्थापनांना परवानगी नाकारली आणि त्याच कारणांसाठी व आधारावरील तक्रारीवर सन्नी वाईन बार ला मात्र परवानगी दिली आहे. यात मात्र तुम्ही आपसी समेटाने प्रकरण निकाली काढा किंवा न्यायालयात जा, असा सल्ला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर जिल्हा अधिक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे. एकाच कारणांसाठी दोघांना वेगळा न्याय तर एकाला वेगळा न्याय देत त्याची पाठराखण यात काही पाणी मुरल्याचा संशय तक्रारकर्ते सचिन चन्ने यांनी व्यक्त केला आहे. आता तातडीने सन्नी वाईन बार च्या अनुज्ञप्तीचे नूतनीकरण करू नये, अशी मागणी सचिन चन्ने यांनी राजुरा पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment