भद्रावती : जावेद शेख प्रतिनिधी :- भद्रावती येथील एका युवकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आरटीओ ई-चलानच्या नावाने आलेला बनावट व्हॉट्सअॅप मेसेज उघडताच युवकाचे व्हॉट्सअॅप हॅक झाले आणि त्याच्या बँक खात्यातून १ लाख ९४ हजार ७०० रुपये काढण्यात आले.
इम्रान खान वय ३४, रा. इंदिरा नगर, भद्रावती यांना १३ मे रोजी व्हॉट्सअॅपवर ई-चलान संदर्भातील मेसेज आला होता. त्यामध्ये एक APK फाईल पाठविण्यात आली होती. त्यांनी ती डाउनलोड करताच मोबाईल हॅक झाला. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवरून आपोआप मेसेज पाठविले जाऊ लागले. तसेच त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून आयएमपीएसद्वारे १ लाख ९० हजार रुपये आणि ४ हजार ७०० रुपये असे दोन व्यवहार करून एकूण १ लाख ९४ हजार ७०० रुपये बँक ऑफ बडोदाच्या खात्यात वर्ग करण्यात आले.
या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment