राजुरा, दि.१९ जून :
वनपरिक्षेत्र राजुरा अंतर्गत वनगुन्हे व अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वनविभागाने धडक कारवाई करत नियतक्षेत्र रामपूर येथील कक्ष क्रमांक १५२ मध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त केला. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.Forest department's major crackdown on sand smuggling.
यामध्ये ट्रॅक्टर मालक आरोपी विशाल नागेश मडावी (२६), ट्रॅक्टर चालक आसिफ सिकंदर शेख (२५), राकेश संजय टेकाम (२५), आकाश तुळशीराम आत्राम (१९), आकाश नवनाथ जाभोर (१८), सय्यद जबीर सय्यद सामीर (१८) यांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी राजुरा येथील इंदिरानगर व सोमनाथपुर वार्डातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या गस्ती पथकाला रामपूर परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तत्काळ कारवाई करत पथकाने अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. तपासादरम्यान संबंधितांकडे आवश्यक परवानगी व कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रॅक्टर जप्त करून वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कारवाई योगेश वाघाये, उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग तथा मंगेश गीरडकर, उपविभागीय वन अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गजानन इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक संजय गरमडे, नियत वनरक्षक मीनाक्षी सातपुते, पवन मंदुलवार, संदीप तोडासे, भोजराज दांडेकर, मारोती चापले, तानाजी कामले तसेच संतोष किनाके (मजूर) यांनी ही यशस्वी कारवाई केली.
वनविभागाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर पुढेही सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी वनसंपत्ती व पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी संशयास्पद हालचालींची माहिती वनविभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*फोटो कॅप्शन*
रामपूर कक्ष क्रमांक १५२ येथे वनविभागाच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून केलेली कारवाई.
0 comments:
Post a Comment