Ads

जिल्हातील पशुपालकांनी पशुवैद्यकीय सेवा, दुग्धव्यवसाय व विविध योजनांचा लाभ घ्यावा

जावेद शेख भद्रावती :-
 महाराष्ट्र राज्याचे आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (IAS) यांनी नुकताच चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनाचा आढावा घेऊन पशुपालकांनी जिल्ह्यत पशुवैद्यकीय सेवा,दुग्धव्यवसाय व विविध योजनांचा लाभ घेण्याचे भेटीच्या वेळी आवाहन केले.Animal husbandry in the district should take advantage of veterinary services, dairy farming and various schemes.
    दौऱ्यात त्यांनी पशुवैद्यकीय संस्था, दूध संकलन केंद्रे तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.यावेळी आयुक्तांनी तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय चिमूर, सावली, ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथे भेट देऊन दवाखान्यांची स्वच्छता, अभिलेख व नोंदवह्या, लसीकरणाची अंमलबजावणी, AEBAS नोंदणी व उपस्थिती प्रणाली, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच पशुवैद्यकीय सेवेची गुणवत्ता याबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कार्यपद्धतीची माहिती जाणून घेऊन मार्गदर्शन केले.
    आयुक्तांनी व्याहाड व किरमटी मेंढा येथील दूध संकलन केंद्रांना (BMC) भेट देऊन विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच अड्याळ येथील अरुणा भेदे यांच्या राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) प्रकल्पास भेट देऊन पाहणी व पडताळणी केली.
 आयुक्तांनी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे, दुग्धव्यवसाय विकासाच्या कामांचे तसेच NLM प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीचे कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने, गुणवत्तापूर्ण व वेळेत काम करून जिल्ह्याला राज्यात आदर्श स्थान मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सतीश राजू, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सुरेश कुंभरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. जिशांत नंदेश्वर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment