Ads

1 व 2 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कनिष्ठ गट अथलेटिक्स स्पर्धा 2026.

राजुरा, दि.२८ जुलै :-
 महाराष्ट्र अथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय कनिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 27 ते 30 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आले आहे. करिता ऑक्टोंबर 2006 ते ऑक्टोबर 2014 दरम्यान जन्मलेल्या, 14, 16, 18 व 20  वर्ष आतील मुले व मुली यांची चंद्रपूर जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा व राज्य स्तरीय स्पर्धे करिता निवड चाचणी चे आयोजन केले आहे. 
District Level Junior Group Athletics Competition 2026 on 1st and 2nd August.
सदर स्पर्धा 1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर च्या सिंथेटिक पटांगणात आयोजित केलेली आहे. खेळाडूंना सदर स्पर्धेत 60मी, 100मी, 200मी, 400मी, 800मी, 1000 मी, 1500मी, 5000मी, 10000मी धावणे, 20000मी चालणे, थाळी, गोळा, भाला फेकणे, लांब उडी व तिहेरी उडी तसेच रीले अशा वयोगटानुसार विभिन्न क्रीडा प्रकारात भाग घेता येईल. विजयी प्रथम दोन खेळाडूंना चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटने तर्फे  राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना ए.एफ.आई. नोंदणी क्रमांक, जन्माचा दाखला, आधारकार्ड व 2 पासपोर्ट छायाचित्र असणे अनिवार्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धा आयोजक श्री सुरेश अडपेवार 9822449916, कु. पूर्वा खेरकर 9552486804, प्रा. संगीता बंबोडे 9271455198 कु. वर्षा कोयचाळे 8975299047, श्री मयूर खेरकर 9921917801यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment