जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय स्केटिंग मॅरेथॉन स्पर्धेतचंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची लयलूट केली आहे. या यशाने चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद भर पडली आहे.
या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी वेगवेगळ्या वयोगटात आणि प्रकारांत यश संपादन केले. विजेत्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
पदक विजेते खेळाडू:
अधिर जुन्नावार:५ वर्षांखालील (U-5) इनलाईन प्रकारात सुवर्णपदक (Gold)
युवान गौरकार: ५ वर्षांखालील (U-5) बिगनर प्रकारात रौप्यपदक (Silver)
ओवी ढवळे: ५ वर्षांखालील (U-5) बिगनर प्रकारात रौप्यपदक (Silver)
वर्णिका कुचेकर: ५ वर्षांखालील (U-5) बिगनर प्रकारात **कांस्यपदक (Bronze)
उमर हनफी:१६ वर्षांवरील (Ab-16) क्वाड प्रकारात रौप्यपदक (Silver)
विष्णू यमजनवार: १० वर्षांखालील (U-10) क्वाड प्रकारात कांस्यपदक (Bronze)
टॉप १० मध्ये स्थान मिळवून कांस्यपदक पटकावणारे खेळाडू:
यश आखाडे
जय इंगोले
देवांशु सैताने
स्वरा कवाडे
या सर्व विजेत्या खेळाडूंना स्केटिंग प्रशिक्षक तथा चंद्रपूर जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे सचिव राजेश येरणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या चमकदार कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, पालक आणि विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 comments:
Post a Comment