Ads

राष्ट्रीय पंच वर्षा कोयचाळे स्टार वन परीक्षा उत्तीर्ण.

राजुरा ,दि.२१ जुलै :-
भारतीय ऑलिम्पिक संघटने अंतर्गत कार्यरत भारतीय बॉक्सिंग संघटना द्वारा आयोजित राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी व पंच परीक्षा बी.एफ.आय.स्टार १ नुकतीच पगवारा पंजाब येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे संपन्न झाली. सदर परीक्षेकरिता  चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका सारख्या ग्रामीण भागातील क्रीडा शिक्षिका तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या तांत्रिक अधिकारी व पंच म्हणून कु. वर्षा छबन कोयचाळे हिने सहभाग नोंदवत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करण्याचा  व विदर्भातील पहिली महिला राष्ट्रीय पंच म्हणून मान प्राप्त केला आहे.Passed the National Five Year Koychale Star One Exam.
 बॉक्सिंग सारख्या शक्ती व कौशल्य विकसित क्रीडा प्रकारात वर्षा हिने पंच म्हणून वर्ष २०१७  ला सुरुवात केली होती . तिने महाराष्ट्राच्या पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून तीन परीक्षा पास केल्या आहेत. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत राष्ट्रीय स्तरावरील मिळालेले यश हे तिच्या परिश्रमाचे फलित आहे. सदर कालावधीत चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे माजी सचिव तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव व आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे ऑबजरवर डॉ.  राकेश तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच राज्य संघटनेचे अध्यक्ष राहुल शेवाळे, उपाध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष  मिलिंद वैद्य चंद्रपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रेमचंद, संघटक प्रा. संगीता बांबोडे,  अमर भंडारवार, प्रा. पूर्वा खेरकर यांचे सहकार्य लाभले असे तिने आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे. सोबतच तिने सर्वांना धन्यवाद दिले आहे. राष्ट्रीय पंच वर्षा कोयचाळे यांच्या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा क्रीडा संघटनेच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहे. वर्षा कोयचाळे या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या संघटिका असून पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाच्या कार्यात सुद्धा कार्यतत्पर आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment