Ads

वीरूर पोलिसांचा गौ तस्करीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!

वीरूर, प्रतिनिधी :
राजुरा तालुक्यातील वीरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौ तस्करीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. आर्वी फाटा परिसरात नाकाबंदी करून गोवंशाची दाटीवाटीने, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता वाहतूक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेत, तीन जिवंत जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत जनावरांसह बजाज आपे असा सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई ठाणेदार गायकवाड व PSI सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.Virur Police's 'surgical strike' on cow smuggling!
वीरूर पोलीस ठाण्याचे पथक ठाणेदार गायकवाड, पोलीस अंमलदार हर्षल लांडे (बक्कल क्र. २१३), पोलीस अंमलदार अविनाश बोरुले (बक्कल क्र. १३१९) तसेच ठाणेदारांचे रायटर राहुल वेद्य यांच्यासह पेट्रोलिंगवर होते. दरम्यान, पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, आर्वी फाटामार्गे एका विना क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या बजाज आपे वाहनातून गोवंशाची कोंबून वाहतूक केली जात आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्वी फाटा परिसरात नाकाबंदी केली. ३० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता आर्वीच्या दिशेने येणारे विना क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे बजाज आपे वाहन पोलिसांनी अडवले.
वाहनाची झडती घेतली असता, मागील डाल्यात अतिशय कमी जागेत दाटीवाटीने दोन जिवंत गोरे व एक जिवंत कालवड कोंबलेले आढळून आले. या जनावरांना हालचाल करण्यासही जागा नव्हती तसेच चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
पोलिसांनी वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव मोहम्मद साजिद मोहम्मद जावेद (वय २४), रा. शिरपूर, जिल्हा आसिफाबाद, तेलंगणा असे सांगितले. त्याच्यासोबत शेख सईद शेख अब्दुल्ला (वय ४१), रा. शिरपूर, जिल्हा आसिफाबाद, तेलंगणा हा असल्याचे समोर आले.
चौकशीदरम्यान जनावरांबाबत समाधानकारक माहिती व वाहनाची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही जनावरे आर्वी येथून वाहनात भरून शिरपूर येथे कत्तलीसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने नेली जात असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून दोन गोरे व एक कालवड, अंदाजे किंमत ६० हजार रुपये, तसेच बजाज आपे वाहन अंदाजे २ लाख रुपये, असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी वीरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment