Ads

जि.प. शाळेच्या धोकादायक इमारतीत विद्यार्थी गिरवतात ज्ञानाचे धडे !

राजुरा : तालुक्यातील गोवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज धोकादायक इमारतीत ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. अल्पावधीतच ही इमारत जीर्ण झाली असून, वर्गाच्या इमारतीच्या छताचे सिमेंट-प्लास्टर निखळून पडत आहे. त्यामुळे येथे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली असून जीर्ण झालेल्या इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन इमारत बांधण्याची मागणी शाळा व्यवस्थापन  समिती व विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. Learning Lessons Under Threat! Students Forced to Study in a Dangerous ZP School Building

राजुरा तालुक्यातील गोवरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असून जवळपास १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ज्या ठिकाणी या मुलांचे भविष्य घडायला हवे, त्या शाळेतील दोन षटकोनी वर्गखोल्यांची इमारत अल्पावधीतच जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही इमारत अल्पावधीतच जीर्ण झाल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवरही आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्गांमध्ये शिक्षण सुरू असताना छताचे प्लास्टर निखळून पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर इमारतीच्या छताला गळती लागते. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे अल्पावधीतच जीर्ण झालेल्या या इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन इमारतीचे बांधकाम करावे अशी मागणी गोवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मार्कंडी लांडे , उपाध्यक्षा सीमा जुनघरी, सुनील मादनेलवार, विनोद परसूटकर, प्रशांत उताणे, सोनाली जुनघरी, कोमल बल्की, नीलिमा ईखारे, साक्षी वाघमारे, शर्मिला कास्वटे यांचेसह पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

.गोवरी येथील जि.प. शाळेच्या दोन षटकोनी इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळत असून अल्पावधीतच या वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. जास्त पावसाच्या दिवशी स्लॅबला गळती लागत असल्याने नवीन इमारत मंजूर करावी किंवा विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी.

_ मार्कंडी लांडे
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, गोवरी
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment