भद्रावती प्रतिनिधी/ जावेद शेख: चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी DYSP सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात व प्रत्यक्ष उपस्थितीत भद्रावती व पडोली पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत १ किलो ३०० ग्रॅमपेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आज दिनांक 02/09/2026 रोजी पहाटे 06:00 वाजतापासून सदर कारवाईला सुरुवात करण्यात आली. भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत DYSP सचिन खेत्रे यांनी प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच विविध अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भद्रावती परिसरात गांजा, अवैध दारू, खर्रा-तंबाखू, सट्टा आदी अवैध व्यवसायांविरुद्ध धडक कारवायांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भद्रावती शहरात गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर काही गांजा सेवन करणारे व्यक्ती भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेरून गांजा खरेदी करून तो भद्रावती शहरात आणून सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या प्रकारामुळे शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन DYSP सचिन खेत्रे यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेतली.
त्यानुषंगाने भद्रावती पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी धीरज, प्रेम, योगेश, नितीन व मपोशी रागिणी यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या तपासादरम्यान गांजा विक्रीबाबत महत्त्वपूर्ण सुगावा पोलिसांच्या हाती लागला.
प्राप्त माहितीच्या आधारे DYSP सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात व प्रत्यक्ष उपस्थितीत पुढील कारवाईचे नियोजन करण्यात आले. यासाठी पोलीस स्टेशन पडोली यांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करण्याचे ठरविण्यात आले.
त्यानंतर भद्रावती पोलीस व पडोली पोलीस यांच्या संयुक्त पथकाने, DYSP सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली व प्रत्यक्ष उपस्थितीत, भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर, पडोली टी-पॉईंटजवळ, चंद्रपूर-नागपूर मुख्य मार्गालगत असलेल्या एका घरावर छापा टाकला.
घराची झडती घेतली असता एका महिलेच्या ताब्यातून १३०० ग्रॅमपेक्षा अधिक गांजा आढळून आला. तसेच गांजा पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सदर गांजा व इतर मुद्देमाल ताब्यात घेतला असून, याप्रकरणी पोलीस स्टेशन पडोली येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया व पुढील तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment