भद्रावती जावेद शेख(प्रतिनिधी):
भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे या उद्देशाने आज दिनांक १८/११/२०२६ रोजी पंचायत समिती, भद्रावती येथे 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' तालुकास्तरीय कृती समितीची
महत्वपूर्ण सभा पार पडली. माननीय गटविकास अधिकारी श्री. आशुतोष सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
All agencies should make coordinated efforts to make all villages in Bhadravati taluka 'healthy villages' — Group Development Officer Ashutosh Sapkal
या बैठकीत तालुक्यातील 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून तालुक्यातील जास्तीत जास्त गावे 'आरोग्य संपन्न गाव' म्हणून नावारूपास आणण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत यंत्रणेने परस्पर समन्वयाने व मिशन मोडवर काम करावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना गटविकास अधिकारी श्री. आशुतोष सपकाळ यांनी सर्व संबंधितांना दिल्या.
या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य उपक्रमांची व सद्यस्थितीची माहिती सभेसमोर मांडली.
सदर सभेस बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) सौ. पूनम गेडाम, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, पत्रकार संघाचे प्रतिनिधी श्री. जावेद शेख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment