बाळासाहेबांचा अपमान युवासेनेला असह्य! शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारत चंद्रपुरात उबाठाचा निषेधाचा एल्गार!

 चंद्रपूर:-शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी फोटो फाडून त्यांचा घोर अपमान केल्याच्या संतापजनक घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
Insulting Balasaheb is unbearable for the Youth Shivsena! Ubatha protests in Chandrapur by defacing Shayna NC's image!
 बाळासाहेबांच्या अस्मितेवर झालेल्या या आघाताविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर आक्रमक पवित्रा घेत निषेध आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपुरात युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना युवासेना सचिव वरून सरदेसाई साहेब युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल दादा काकडे युवांसेना महाराष्ट्र राज्य विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले.

मुंबईत आयोजित शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेत शायना एनसी यांनी सर्वांसमोर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचा आणि आमच्या दैवताचा अवमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ज्या बाळासाहेबांच्या नावावर हे सत्ता आणि राजकारण उपभोगत आहेत, त्याच बाळासाहेबांचा असा जाहीर अपमान करणाऱ्या गटातील प्रवक्त्याला लाज वाटली पाहिजे, असा घणाघाती हल्लाबोल विक्रांत सहारे यांनी केला. बाळासाहेबांचा हा अवमान कदापि सहन केला जाणार नाही; शायना एनसी यांनी तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशाराही सहारे यांनी दिला. आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला तीव्र संताप व निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात युवासेना सहसचिव तथा युवतीसेना चंद्रपूर जिल्हाधिकारी रोहिणी ताई पाटील, शिवसेना शिक्षक सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश नायडू, भारतीय कामगार कंत्राटी सेना जिल्हाध्यक्ष अमोल मेश्राम, युवासेना उपजिल्हाप्रमुख यशपाल कमटम, युवासेना तालुकाप्रमुख सागर गबने, युवासेना शहर प्रमुख तथा उपशहर प्रमुख फरदीन शेख, युवासेना उपशहर प्रमुख राजकुमार पाचभाई, राहुल समुद, निलेश साव, अभिषेक गायकवाड, निखिल मोहरले, अनुष खोब्रागडे, धम्मदीप खोब्रागडे, ओम कोपुलवार, भारत मंगाम, चेतन जिराफे, पराग कूत्तरमारे, अनुराग गजघाटे, राज खरोले, अनुप इंदुरवार, तन्मय राऊत, शुभम सहारे, सूर्यकांत भावने, अमर चित्तागवार, आयुष सहारे, कुणाल सहारे, जय अडेल, शुभम भीमनवार, संकेत तावडे, रुपेश धनराज, खुशाल खुदमेतगे, प्रतीक मेश्राम, पवन उडाखे, ऋषि बडगी, क्रिस असरते, सोमैया विश्वकर्मा, क्रिश, प्रथम वनधारे, रोशन परोधी, अभिजीत मेश्राम, अतुल मिश्रा आणि अफ़रीद शेख आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment