नागपूर चंद्रपूर खाजगी बागडी बस मध्ये मुलीचा विनयभंग
नागपुर वरून संध्याकाळी निघालेल्या बागडी ट्रॅव्हल्स मध्ये एका मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. ही मुलगी नागपुर वरून चंद्रपूरला येत होती. या गाडीमध्ये पॅसेंजर जास्त असल्याने या मुलीला ड्रायव्हर केबिन जवळ बसविण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स चे सर्व लाईट बंद करण्यात आले होते. यानंतर ही ट्रॅव्हल्स बुट्टीबोरी येथे थांबली. यामध्ये दुसऱ्या ट्रॅव्हल्सचा कंडक्टर म्हणून कार्यरत असलेला कुणाल कवडू करकमवार वय27 राहनार सावली. मद्यधुंद अवस्थेत ट्रॅव्हल्स क्रमांक mh40 BL 0468 गाडीमध्ये बसला. बसमध्ये चढल्यानंतर दारू पिऊन असलेल्या या कंडक्टरने शिव्या देण्यास सुरु केले. त्यानंतर जवळच बसून असलेल्या मुलीकडे त्याचे लक्ष गेले. ही मुलगी फोनवर घरी भांडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. याचाच फायदा घेत बस वाहकाने या मुली सोबत आपुलकीचे दोन शब्द बोलून तिच्या जवळ बसला. तोपर्यंत बस मधील सर्व लाईट बंद झालेले होते. बस केबिनमध्ये मुलगी आणि कंडक्टर व ड्रायव्हर तीनच व्यक्ती होते. हा कंडक्टर मुलीच्या जवळजवळ सरकत होता. व तिचे मन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न तो करत होता. हा सगळा प्रकार बाजूनी बसलेल्या एका प्रवाशाला समजला त्याने स्वतःची बसण्याची जागा मुलीसाठी दिली.
पण बस वाहकाचा पुरुषार्थ जागा असल्याने केबिनच्या मागील सीटवर येऊन बसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यानंतर ही बाब सर्वांच्याच लक्षात आली. आणि प्रवाशांनी या बस वाहकास चोप देण्याचे ठरविले. तोपर्यंत बस वरोरा स्थानकावर पोहोचली होती. बागडी ट्रॅव्हल्सचे एजंट लगेच याठिकाणी सावरासावर करण्यासाठी पुढे आले. परंतु प्रवाशी चांगलेच चिडले असल्याने ही बस पोलीस स्टेशन वरोरा येथे सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास लावण्यात आली.
वरोरा पोलिसांनी बस चालकास चांगलाच चोप देत कलम 354 अ भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरोरा ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
पोलिसांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर ही बस प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सोडून देण्यात आली. परंतु या बसला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी होती का हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
0 comments:
Post a Comment