तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती तालुक्यात आझादी का अमृत महोत्सव दि.१४ नोव्हेंबर पर्यंत राबविला जाणार असून त्याची सुरुवात दि.२ आॅक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करुन करण्यात आली.
सदर रॅली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापासून सुरु करण्यात आली. गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन रॅलीचे विसर्जन करण्यात आले.यावेळी येथील न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डी. एस. शर्मा, न्यायाधीश सी. एच. कुलकर्णी, तहसीलदार डाॅ. नीलेश खटके, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. उदय पलिकुंडवार, नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी गुरुदेव सेवा मंडळाच्या कलावंतांनी स्वच्छता व डेंगू, मलेरिया या आजाराविषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले.
दरम्यान,दि.३ आॅक्टोबरला तालुक्यातील कोंढेगाव येथे वन्यजीव सप्ताहानिमित्य कायदेविषयक मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रम,दि.४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता भद्रावती येथे स्वच्छता दिन जनजागृती कार्यक्रम व पर्यावरण विषयक कायदे यावर मार्गदर्शन, दि.६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भद्रावती येथे मार्गदर्शन शिबिर व बेटी बचाओ रॅली, दि.२६ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम, दि.३१ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता चंदनखेडा येथे शेतक-यांना सात/बारा वाटप व मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रम तसेच सायंकाळी ६ वाजता माजरी येथे झोपडपट्टीवासियांना कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment