Ads

परसोडा लाईमस्टोन खदानीकरीता भूमिअधिग्रहण अधिसुचना त्वरीत काढा - हंसराज अहीर #HansrajAhir





महापंचायतमध्ये शेतकरी, प्रकल्पग्रस्तांची एकरी 25 लाख व नोकरीची मागणी

बी.एस इस्पात च्या धर्तीवर इथेही प्रति एकरी 25 लाख मोबदला व नोकरी मिळवून देण्याचा हंसराज अहीर यांचा महापंचायतीमध्ये निर्धार...!

चंद्रपूर:- एम.पी. बिरला सिमेंट उद्योगाव्दारे लाईमस्टोन माईनकरीता कोरपना तालुक्यातील परसोडा, कोठोडा (खु), रायपुर, कोठोडा (बु), गोविंदपुर, नवीन परसोडा, पांडुगुडा आदी गावातील शेतकÚयांच्या जमीनीची अधिग्रहण प्रक्रीया सुरू न केल्याने या जमिनी दलालांच्या मार्फतीने खरेदी करण्याचा प्रकार सुरू असून त्यावर त्वरीत प्रतिबंध घालुन संबंधीतांवर कडक कार्यवाही करावी तसेच जिल्हा प्रशासनाने या सर्व गावातील जमिनी खरेदी करीता भूमीअधिग्रहण अधिसुचना त्वरीत काढावी. बी.एस इस्पात कंपनीने माइनींग करीता दिलेला प्रति एकरी 25 लाख रूपये मोबदला या शेतकÚयांना नोकरीसह द्यावा अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी परसोडा येथे आयोजित प्रकल्पग्रस्त शेतकÚयांच्या महापंचायतीस संबोधीत करतांना केली.
दि. 05 आॅक्टो. 2021 रोजी पार पडलेल्या या महापंचायतीमध्ये शेतकरी बांधव व प्रकल्पग्रस्तांनी प्रति एकरी 25 लाख रूपये मोबदला व नोकरी मिळवून देवू असा निर्धार व्यक्त करून हंसराज अहीर यांनी यावेळी सांगीतले की, मागील 14 वर्षांपासुन लाईमस्टोन माईनींग करीता एम.पी. बिरला उद्योग समुहास लीज मिळाली आहे परंतू अधिग्रहण प्रक्रीया चालु न केल्याने या जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. या माध्यमातून भोळ्या भाबळ्या शेतकऱ्यांची भूमिधाऱ्यांची लुट, बनवाबनवी व त्यांच्याशी धोका करण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रवृतींवर तातडीने कठोर कारवाई करून हा प्रकार त्वरीत थांबवावा अशी मागणी अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकÚयांशी संवाद साधतांना केली.
एप्रिल 2020 मध्ये या भूमिअधिग्रहणाकरीता जनसुनावणी पार पडली असतांना जमिनीचे अधिग्रहण केले नाही. दलालांना जमिनी खरेदी करण्यास रान मोकळे करून देण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अहित होत असल्याचे भान ठेवल्या गेले नाही ? असा संतप्त सवाल करून हंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासनाने या सर्व जमिनीच्या अधिग्रहणाची नोटीस काढावी अशी सुचना केली. ग्रामपंचायतींनी यापूर्वीच नाहरकत प्रमाणपत्रा सादर केले असल्याने उद्योग व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनास या प्रयोजनार्थ कशाची प्रतिक्षा आहे असा सवालही त्यांनी या महापंचायतीमध्ये उपस्थित केला. स्थानिकांना रोजगार तसेच शेतकÚयांच्या न्याय मागण्या व हक्कांसाठी आपण त्यांच्या सोबत सदैव उभे राहु असे भरीव आश्वासनही अहीर यांनी या महापंचायतीव्दारा उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना दिले.
या महापंचायतीमध्ये भाजपा कोरपना तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, संजय मुसळे, रामाजी मोरे, अॅड. प्रशांत घरोटे, कवडु जरीले, शशिकांत आडकीने, पुरूषोत्तम भोंगळे, किशोर बावने, अरून मडावी, अरून डोहे प्रकल्पग्रस्त शेतकरी महादेव बेंडले, प्रभाकर आत्राम, माजी उपसरपंच हरीदास पारखी, कार्तीक बोडलावार, गंगाधर कुंटावार, सखाराम तलांडे, पितांबर ओंगलवार, संजय सोलमवार, जयवंत देवडगले, रामलु कुलबोईनवार, संतोष डोनेवार, रामलु बोईनवार यांचेसह शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment