Ads

महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :-
विविध मागण्यांसाठी एस. टी. महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. परिणामी एस. टी महामंडळाची वाहतूक प्रभावित झाली. दरम्याण आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या असून या सर्व मागण्या येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे राशिद हुसेन, रुपेश कुंदोजवार, विलास वनकर, अखिल गांवडे, उमेश भानारकर आदिंची उपस्थिती होती.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करण्यात यावे, राज्य परिवहन मंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा, एस. टी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन या तत्वावर किमान वेतन कायद्यानुसार 1 एप्रिल 2016 पासून 18 हजार मूळ वेतन देण्यात यावे, 7 व्या वेतन आयोगानूसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राज्य महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर बस स्थानक येथे आंदोलन सुरु केले आहे. दरम्याण आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत सदर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. ग्रामिण भागांना शहराशी जोडण्याचे काम महामंडळच्या बसेसच्या माध्यमातून केल्या जात आहे. जिथे मार्ग तिथे एस.टी. बस अशी ओळख महामंडळाने तयार केली आहे. महामंडळने प्रवासी लोकांमध्ये विश्वास व आपुलकीची भावणा निर्माण केली आहे. हि सर्व उपलब्धी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीतून महामंडळाला मिळाली आहे. अनेकदा बसमध्ये मिळालेल्या मौल्यवान वस्तू परत करत येथील कर्मचाऱ्यांनी आपल्या इमानदारीचा परिचय दिला आहे. सणासुदीच्या दिवसातही कर्त्यव्याप्रती प्रामाणिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जोरावर महामंडळाची सेवा अविरत सुरु राहते. त्यामूळे येथील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष दिल्या गेले पाहिजे अशी भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. या प्रसंगी कर्मचार्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन आ. जोरगेवार यांना दिले. त्यानंतर सदर कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्या येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचे यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना सांगीतले आहे. यावेळी मंगेश डांगे, पराग गोंड्रलवार, आसिम मिर्जा, अमोल पडगेलवार, संतोष भिवापूरे, प्रविण नंदावरे, ललीत अहिरकर, अंजू टोंगे, गणेश पाचभाई, विनोद दाता यांच्यासह आंदोलक कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment