गडचांदूर प्रतिनिधी :- कोरपना तालुक्यातील पैनगंगा या खुल्या कोळसा खाणीत पीसी मशीनमध्ये दबून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ आक्टोंबर रोजी घडली.दिनेश पटेल असे मृत्यू व्यक्तीचे नाव असून त्याठिकाणी ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार वेकोलीच्या पैनगंगा खुल्या कोळसा खाणीत महालक्ष्मी या प्रायव्हेट कंपनीद्वारे ओबी कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे.अशातच दिनेश पटेल हा रात्रपाळीत पीसी मशीनवर काम करत होता.त्यानंतर तो शौचास गेला असता त्यांच्या सोबत असलेल्या कामगाराने पीसी मशीन चालविण्याचा प्रयत्न केला.दिनेश याच्यावर पीसी मशीन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी सदर ठिकाणी धाव घेत आरोपी भावीक लिंबानी याला अटक केली.भादवी २७९, ३०४(अ) या कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजीत आमले यांच्या नेतृत्वात सपोनि प्रमोद शिंदे करीत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. One dies after being crushed in PC machine at Panganga coal mine.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment