चंद्रपुर :- 26/11 ला मुबंई येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या जवानांना काल यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महाकाली पोलिस चौकी समोरील हेमंत करकरे चौकात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे करणसिंह बैस, पंकज गुप्ता, गौरव जोरगेवार, कुमार जुनमुलवार, संगीता कारर्लेकर, चंद्रकांत दूर्वे, गीतेश मुसनवार, अंकित चौहान, शुभम धानुका, शुभम बारसिंगे, पलक यादव, शशांक धानुका, सोहैल पठान, गौरव बैस, करण दूर्वे, हिमेश बुंदेल, विक्रमसिंह राठौर, राधे विश्वकर्मा, शोएब पठान, पीयूष मंडल आदिंची उपस्थिती होती.
मुंबई येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात एटिएस चे प्रमूख असलेले हेमंत करकरे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी शहिद झाले होते. विशेष म्हणजे हेमंत करकरे यांनी चंद्रपूर येथेही कर्तव्य बजावले आहे. त्यामूळे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाकाली पोलिस चौकी समोरील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसा फलकही तेथे लावण्यात आला आहे. दर वर्षी येथे यंग चांदा ब्रिगेडच्यावतीने श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यंदा ही यंग चांदा ब्रिगेडच्या भिवापूर शाखेच्या वतीने येथे श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथे भक्तीपर गीतांच्या माध्यमातून शूर विरांना नमन करण्यात आले. त्यानंतर कॅंन्डल प्रज्वलीत करत शहिद हेमंत करकरे यांच्या नावाच्या फलकावर व त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन दोन मिनीटांचा मौन पाळत विर शहिद जवाणांना भावपूर्ण श्रंध्दाजली अर्पण करण्यात आली. About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment