Ads

जिल्ह्यातील रेल्वे व कोळसा खाणविषयक विविध प्रश्नांवर.केंद्रीय राज्यमंत्राी रावसाहेब दानवे यांचेशी हंसराज अहीर यांची चर्चा


चंद्रपूर -
चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाण मंत्रालय, रेल्वे मंत्रालयाशी संबंधीत विविध प्रश्नांबाबत तसेच चंद्रपूर, बल्लारशाह व अन्य रेल्वे स्टेशनवर चालणाऱ्या गाड्या पूर्ववत चालविण्याचा आग्रह पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केंद्रीय कोल व रेल्वे राज्यमंत्राी रावसाहेब दानवे यांची नवी दिल्ली येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेवून केला.
या भेटीप्रसंगी अहीर यांनी जिल्ह्यात बंद करण्यात आलेल्या महत्वपूर्ण रेल्वे गाड्यांमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी व नोकरदार वर्गास मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याकडे मंत्राीमहोदयांचे लक्ष वेधले. यावेळी मंत्रयांना पुणे, मुंबई पॅसेंजर तसेच अन्य एक्स्प्रेस गाड्यांची यादी सादर करून काही गाड्यांना चंद्रपूर पर्यंत तर काहींना बल्लारशाह पर्यंत चालविण्यात याव्या अशी मागणी केली.
या भेटीत अहीर यांनी जिल्ह्यातील अतिशय गहण असलेला वेकोलि प्रश्न निकाली काढण्याचे आदेश द्यावेत तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मोबदला व नोकरी या दोन्ही विषयावर मंत्रयांशी सखोल चर्चा केली. गत तीन महिण्यात जवळपास 2700 प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबदल्यात नोकऱ्या मंजुर आहेत परंतू वेकोलि प्रबंधनाकडुन त्यांना रूजु करण्यास फार विलंब होत असल्याच्या बाबींकडेही त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रयांचे लक्ष वेधले. नोकरीस अपात्रा ठरविल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या योग्यतेनुसार काम देण्याची आग्रही भूमिकासुध्दा अहीर यांनी यावेळी घेतली. मंत्राीमहोदयांनी कोळसा खाण प्रकल्पातील जुनी प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश संबंधीतांना द्यावेत अशी विनंती केली.
महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती वेकोलिमध्ये (WCL ) चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येत आहे. अशा प्रसंगी आपण स्वतः उपस्थित राहुन आपल्या हस्ते शेतीच्या मोबदल्यापोटी मिळणाऱ्या धनादेशाचे वितरण तसेच नोकरी विषयक नियुक्तीपत्रो प्रदान करण्यासाठी चंद्रपूर दौऱ्यावर येण्याचे निमंत्राणही रावसाहेब दानवे यांना दिले तसेच घुग्घुस येथील राजीव रतन हाॅस्पीटलचे सेंन्ट्रल हाॅस्पीटलमध्ये अपग्रेडेशन झाल्यानंतर या हाॅस्पीटलला भेट देवून तेथे एखादा समारंभ करण्याची विनंती श्री अहीर यांनी केली. त्यांच्या या निमंत्राणाचा स्वीकार करून मंत्राीमहोदयांनी लवकरच चंद्रपूरला भेट देण्याचे मान्य केले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment