शेगांव :- कोरोना महामारीच्या काळात रक्तपेठ्यात निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे रूग्णांची होत असलेली धावपळ लक्षात घेत शेगाव पोलीस स्टेशन मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केलं.
कोरोना काळात भीतीमुळे नागरिक रक्तदान करण्यास धजावत होते परिणामी सिकलसेक,थालसेमिया या सारख्या गंभीर आजराच्या रुग्णांना रक्ताची चणचण भासत होती.रक्तपेठ्यात मोठी तूट निर्माण झाली या साठी पोलीस विभागाच्या पुढाकाराने रक्तदान मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या पुढाकाराने क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादनपर उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचे उदघाटन चिमूर चे अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी केलं. या प्रसंगी ठाणेदार अविनाश मेश्राम उपनिरीक्षक प्रवीण जाधव , जीवनज्योती रक्तपेढी चे किशोर खोब्रागडे, सहकारी पोलीस अधिकारी- कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment