Twenty-four hour patrol of the forest department to control man-eating tigers |
पोंभूर्णा(दुर्योधन घोंगडे):-पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या शेतशिवारात वाघाच्या हल्ल्याचे एकामागे एक झालेल्या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे. सलग तीन दिवसात तीन घटना घडले असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.तर या चालू वर्षात वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. सदर घटनांमुळे सतर्कता ठेवत पोंभूर्णा वनविभागाची टिम ॲक्शनमोडवर असून वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी चोवीस तास गस्त, व ट्रप कॅमेरे लावून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच जंगलाच्या कडेलगत असलेल्या गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
कसरगट्टा बिटातील कविटबोळी शेतशिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. यात कसरगठ्ठा येथील महिलेचा मृत्यू झाला. हि गोष्ट ताजी असतांनाच दुसऱ्या दिवशी पोंभूर्णा येथील स्वमी विवेकानंद शाळेजवळील बोरीच्या नाल्याजवळ एका गॅस-शिगडी दुरस्ती करणाऱ्या युवकावर वाघाने झडप घातली यात तो गंभीर जखमी झाला. तिसरा दिवसही वाघाच्या हल्ल्याने रिकामा निघाला नाही चेक बल्लारपूर शेतशिवारात बकऱ्या चरतांना वाघाने हल्ला चढवून एक बकरी फस्त केली.
सदर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या या भागात कापूस वेचणी व धान चुरण्याचे हंगाम सुरू आहे. मात्र वाघाच्या भितीने शेतकरी शेतमजूर कोणीही जंगलव्याप्त परिसराकडे भिरकतांना दिसत नाहीये. वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिगडत आहे. कापसाचे उभे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
*तालुक्यात वाघाची संख्या किती*
- या महिण्याभरात चिंतलधाब्यात शेतकऱ्यावर हल्ल्या,केमारा येथे मेंढपाळावर हल्ला, चेक हत्तीबोडीत महिलेवर हल्ला, पोंभूर्णा येथे युवकावर हल्ला,चेक बल्लारपूरात बकरीवर हल्ला,सेल्लूर नागरेड्डीत वाघाचा धुमाकूळ,तर कविठबोळी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू चे अनेक घटना घडत आहेत. पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्याचे अनेक घटना घडल्या आहेत.यात काहींना प्राण गमवावे लागले आहेत तर काहीजण गंभीर जखमी झाल्याचे घटना आहेत. तालुक्यातील वाघांचे वावर मोठ्या प्रमाणात असल्याने पोंभूर्णा तालुक्यात नेमके किती वाघ आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
*वाघाच्या वावर क्षेत्रात कॅमेरे*
वाघाच्या वावर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी ११ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असुन वाघाच्या बंदोबस्तासाठी ४६ वन अधिकारी व कर्मचारी २४ तास गस्त घालत आहेत. पोंभूर्णा वनविभागाने वाघाच्या बंदोबस्तासाठी कंबर कसली असून वनविभाग ॲक्शन मोडवर आहे. वाघाचे पगमाॅर्क शोधले जात आहेत तर ट्रप कॅमेरेतून वाघाचे वास्तव्याची माहिती तपासली जात आहेत.
----------------------------------
*वनकर्मचारी देणार पाहारा*
माणसांवर हल्ले करीत आहे. जंगलानजीक असलेल्या शेतात कापूस उभे आहे.कापूस वेचणीचे काम करण्यासाठी कुणीही शेताकडे जात नसल्याने वनविभाग अश्या संवेदनशील भागात वनकर्मचारी पाहारा देणार असल्याची माहिती आहे. यामुळे शेतकरी कापूस वेचणीचे व धान चुरण्याचे काम करू शकतील.
0 comments:
Post a Comment