चंद्रपूर : वन्यप्राणी आणि मनुष्यच्या संघर्षात मनुष्याचा बळी जात आहे . वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीच्या जंगल परिसरात बिबट्याने एका युवकाला ठार मारल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास परत महिलेसह एका इसमावर बिबट्याने हल्ला केला. उपचारादरम्यान अनिल मुंजेवार रा. दुर्गापूर यांचा मृत्यू झाला.
वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीच्या जंगल परिसरात गुरुवारी वच्छला थोरात व अनिल मंजेवार लाकड गोळा करण्याकरिता गेले होते. वच्छला ही लाकडे गोळा करून मोळी बांधत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घेतली. बाजूलाच असलेला अनिल मुंजेवार मदतीकरिता पुढे सरसावला. तोच बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. कोळसा खाणीच्या 11 KV सबस्टेशनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात अनिल मुंजेवार यांना दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. वच्छला थोरात यांच्यावर उपचार सुरू आहे.
0 comments:
Post a Comment