Ads

अजयपुर शेतशिवारात वनविभाग व इको-प्रो वन्यजीव रेस्क्यू दल कडून मगरीचे रेस्क्यू.


चंद्रपुर :-
चंद्रपूर-मूल रोड लगतच्या अजयपुर गावातील शेतशिवार मधे आलेली मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन वनविभाग व इको-प्रो वन्यजीव रेस्क्यू दल च्या सदस्यानी यशस्वी के
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या बफर क्षेत्रातील चंद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत वलनी राउंड मधील अजयपुर गावाच्या शेतशिवारात मागील दोन-तीन दिवस पासून मगर आल्याची माहिती वनविभाग ला मिळाली होती. सध्या शेतात धानाचे पिक असून शेतकरी शेतात काम करीत असताना त्यांना दिसून आले. दोन्ही बाजुस असलेल्या शेतशिवार च्या मधात असणाऱ्या नाल्यात मगर होती, जवळपास 7-8 फुट लांब मगर नाल्यात वाढलेल्या बेशरम वनस्पती आणि मोठ्या गवतात होती. सदर मगरीची माहिती मिळताच वनरक्षक सुधीर बोकडे घटनास्थळी पोहचुन याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर यांनी दिली. लगेच वनकर्मचारी सोबत पोहचुन स्थिति नियंत्रनात घेतली.
शेतशिवार च्या मधे असलेल्या सदर मगरीचे रेस्क्यू करणे आवश्यक असल्याने याची माहिती माजी मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांना देण्यात आली. ते इको-प्रो वन्यजीव संरक्षक दल च्या सदस्य सोबत घटनास्थली पोहचले. इको-प्रो टीम व चंद्रपुर बफर चे वनकर्मचारी यांनी आरएफओ स्वाती म्हैसकर यांच्या मार्गदर्शनात सदर रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. सदर मगर ताडोबा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन पोडशेलवार यांनी पाहणी केली, अवस्था चांगली असल्याने ताडोबा बफर मधील धरणात निसर्गमुक्त करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मून, स्वाती म्हैसकर, बंडू धोतरे व कर्मचारी उपस्थित होते.
Crocodile rescue from Forest Department and Eco-Pro Wildlife Rescue Team at Ajaypur Farm
रेस्क्यू टीम मधे चंद्रपुर बफर चे ऎस आर घागरगुंडे, जी डब्लू वरगंटिवार, यू जी गाठले, एमबी नागोसे, एस जी चौरे, जीजे दीवटे, ए बी गेडाम, जेएम माहुलिकर, बीएस टेंभेकर, एस डी पाटिल सहभागी होते, तर इको-प्रो चे बंडू धोतरे सह राजेश व्यास, अमोल उत्तलवार, जयेश बैनलवार, वैभव मडावी, निशांत चहांदे सहभागी होते. या आपरेशन मधे वनमजूर व स्थानिक नागरिकांनी मौलाचे सहकार्य केले.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment