Ads

किल्ला पर्यटनासाठी हेरीटेज वॉक मार्गाची इको-प्रो कडुन स्वच्छता व दुरस्ती.

चंद्रपूरः-
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारसा पाहण्याची, इतिहास जाणुन घेण्यासाठी इको-प्रो च्या किल्ला स्वच्छतेसोबत सुरू करण्यात आलेल्या हेरीटेज वॉक च्या किल्ला मार्गाची स्वच्छता व मार्ग सुरळीत व्हावा म्हणुन अभियान राबविण्यात येत आहे.
मागील चार वर्षापासुन इको-प्रोच्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सोबतच मागील दोन वर्षापासुन किल्ला पर्यटनाची सुरूवात करण्यात आलेली आहे. या 'किल्ला पर्यटन हेरीटेज वॉक' मधुन स्वच्छ करण्यात आलेल्या किल्ल्याच्या भिंतिवरुन रामाळा तलाव लगतच्या बगड खिडकीच्या बाजुचे बुरूज क्रमांक 4 ते अंचेलश्वर मंदीर गोंडराजे समाधिस्थळ बुरूज 10 पर्यत हा हेरीटेज वॉक असतो. या किल्ल्याच्या वरून जो पादचारी मार्ग आहे, जसे ग्रेट चाईना वॉल किंवा भारतातील ग्रेट वॉल असलेली ‘कुंभलगड’ किल्ला प्रमाणे या पदभ्रमण मार्गावरून पर्यटकांना गोंडकालिन इतिहास व वास्तुची माहीती इको-प्रो संस्थेच्या पर्यटक मार्गदर्शक असेलेले गाईड कडुन देत हा हेरीटेज वॉक पुर्ण केला जातो. स्थानिक तसेच बाहेरून येणाÚया पर्यटकांना ही मोठी पर्वणी असते. खंडहर प्राप्त झालेल्या या किल्ला परकोटाच्या स्वच्छतेनंतर एका भागातुन ही पर्यटनाची सोय इको-प्रो ने करून दिली आहे. प्रत्येक रविवारला होणाÚया हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होण्याचे आवाहन इको-प्रो तर्फे करण्यात आले आहे.
या हेरीटेज वॉकच्या मार्गात अनेक अडचणी असल्याने दरवर्षी मोसमाच्या सुरूवातीस संस्थेचे सदस्य पावसाळयात वाढलेली झाडी-झुडपे काढुन स्वच्छ करीत असतात. तसेच या मार्गात बगड खिडकी जवळ, बुरूज 7 मसन खिडकी जवळ तसेच रामटेके वाडीत तुटलेल्या किल्लाच्या भिंतीच्या भागातुन पर्यटकांना व्यवस्थित जाता यावे, पर्यटन सुरळीत व्हावे म्हणुन बरेच प्रयत्न करावे लागतात, दगडांची रास रचुन मार्ग सुरळीत केला जातो. कचरा, अडगळ काढुन टाकण्यात येते, यामार्गातील किल्ल्याच्या भिंतीची तसेच तुटलेल्या बुरूजाची पुरातत्व विभागाकडुन पुर्णबांधकाम आवश्यक आहे, तेव्हाच सदर पर्यटन मार्ग पर्यटकांकरिता व्यवस्थित होईल, याकरिता सातत्यपूर्ण मागणी केली जाते.
किल्ला स्वच्छता सोबतच इको-प्रो ने किल्ला पर्यटन सुरू केल्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या हेरीटेज वॉक मार्गात किल्ल्याचा मोठा भाग तुटलेल्या पाहुन इको-प्रो तर्फे सुरू केलेले पर्यटन सुरळीत व्हावे म्हणुन लोखंडी ब्रिज बांधकाम करून दिल्यामुळे एक मोठी अडचण दुर झालेली होती. मात्र या मार्गात असलेल्या अन्य अडचणी फक्त पुरातत्व विभागच दुर करू शकतो. इको-प्रो संस्था आपल्या पातळीवर एकीकडे स्वच्छता अभियान राबवित आहे तर, दुसरीकडे स्थानिक पर्यटन विकासाला हातभार लागावा म्हणुन प्रयत्नशिल आहे, आपला ऐतिहासिक वारसा जपला जावा, व्यापक जनजागृती व्हावी म्हणुन कार्य केले जात आहे. मात्र या मार्गात असलेल्या किल्ल्याच्या छोटी-छोटी डागडुजी, पुर्णबांधकामाची कामे मागील तिन वर्षात अदयापही पुर्ण केले गेले नाही, हि शोकातिंका आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment