Ads

हिंदुत्व आणि विकासाच्या विचारांनी प्रेरित होऊन ग्रामपंचायत सदस्य सोबत अनेक युवकांची शिवसेनेत व युवासेनेत दमदार एन्ट्री!

चंद्रपुर :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा ठसा मनात ठेवून तसेच राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व युवासेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या विकासाभिमुख, कार्यकर्त्यांनिष्ठ आणि जनसेवाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अनेक उत्साही युवकांनी शिवसेना (शिंदे गट) आणि युवासेनेत जंगी प्रवेश केला.
Inspired by the ideas of Hindutva and development, many youths, including Gram Panchayat members, have made a strong entry into the Shiv Sena and Yuva Sena!
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक साहेब, शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश भाऊ जीवतोडे, पूर्व विदर्भ सचिव शुभमभाऊ नवले, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे व युवासेना लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी नवनियुक्त युवासेना जिल्हा संघटक सुमित भाऊ हस्तक यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतून आलेल्या असंख्य युवकांनी एकमुखाने शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेत “हिंदुत्व, विकास आणि जनसेवा” यासाठी झटण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमात उपस्थित युवकांना उद्देशून बोलताना सुमित भाऊ हस्तक म्हणाले —

>शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकास, हिंदुत्व आणि कार्यकर्त्यांचा सन्मान यांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक गावात युवासेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे!युवाशक्ती एकवटली तर कोणतीही ताकद थांबवू शकत नाही — हेच आम्ही सिद्ध करून दाखवू!” 🔥

या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील युवासेनेला नवचैतन्य मिळाले असून, युवकांमध्ये जोश, उत्साह आणि कार्यभावनेचा नवा ऊर्जावान संचार झाला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा ताकदीने फडकू लागल्याचे दृश्य या प्रवेश सोहळ्यात दिसून आले. यावेळी नगरसेवक दिनेश भाऊ यादव, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, लोकसभा समन्वयक महेश जीवतोडे, वि. प्रमुख मुनेश्वर बदखल, युवासेना शहर प्रमुख राज चव्हाण, माजी शिवसेना शहर प्रमुख संदीप भाऊ मेश्राम, युवासेना शहरप्रमुख चेतन सातपुते, उपशहर प्रमुख युवासेना सौरभ टाले, युवासेनेचे निलेश उरकुळे, प्रशांत धुळे, आकाश टोंगे, सागर टोंगे, आशिष टोंगे, गौरव श्रीरामे, अमित जीवतोडे, अजय परचाके, आशिष गेडाम, आशिष भोयर, मंगेश तुमराम, संदीप नागपुरे, अमोल लेडांगे, प्रज्वल एकरे, प्रवीण नागपुरे, चंदू मडावी, प्रमोद खापणे, विजय काळे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment