चंद्रपुर:-महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या गाड्या बंद असल्याचा फायदा घेऊन खाजगी बस, ट्रॅव्हल्स व काळी पिवळी गाड्यांचे मालक चालक हे प्रवाशांकडून जादाचे पैसे लावून प्रवाशांना तिकीट न देता एकप्रकारे प्रवाशांची मोठी आर्थिक लूट करीत आहे. या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता ते म्हणतात की आम्हचे काम खाजगी गाड्यांच्या चालक मालक यांच्यावर कारवाई करण्याचे नाही तर मग प्रवाशांची जी आर्थिक लूट होत आहे त्याविषयी जायचे कुणावडे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरोरा शास्या पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांकडून जादाचे पैसे घेणाऱ्या खाजगी वाहतुकदाराना काही दिवसापूर्वी गुलाबाच्या फुलाचे गुच्छ देऊन गांधीगिरी केली होती व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन जादा पैसे आकारणी करणाऱ्या खाजगी वाहतूकदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती, पण बेकायदेशीरपणे खाजगी ट्रॅव्हल्स, काळी पिवळी गाड्यांच्या मालक चालक यांच्याकडून एन्ट्री च्या नावाखाली हसा वसुली करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नाही.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बघता चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीकरीता उपप्रादेशिक परिवहन विभागातील निरीक्षकांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यात यरोरा भद्रावती तालुक्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक साळुंके हे समन्वय अधिकारी म्हणून काम बघत असल्याने वाहतूक प्रवाशी खाजगी गाड्यांच्या मालकांनी प्रवाशांची लूट चालवली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांच्याकडे केली होती व खाजगी वाहतूकदार ज्या पद्धतीचे आगाऊ पैसे प्रवाशांकडून घेतात त्यावर अंकुश लावावा अशी विनंती केली होती परंतु साळुंके यांच्याकडून कुठलीही कारवाई संबंधित खाजगी वाहतूकदारांवर झालेली नाही. याचा अर्थ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांशी खाजगी वाहतूकदार यांची साठगांठ असल्याचे शीद्ध होते, त्यामुळे या प्रकरणी तात्काळ निर्णय घेऊन व एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवून खाजगी ट्रॅव्हल्स व काळी पिवळी गाड्यांच्या मालकांवर व संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल व आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडला यार त्याची जबाबदारी ही उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात केला आहे. यावेळी मनसेतर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सुनीता गायकवाड जिल्हा सचिव किशोर माडुरवार, वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाने तालुका सचिव कल्पक दोरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जमील शेख व इतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment