चंद्रपुर :- सुप्रीम कोर्टाने आज (दि.१५ डीसेंबर) ला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली ओबीसी आरक्षणाकरीताची इम्पेरीकल डाटा केंद्राने देण्यासंबंधीची याचिका फेटाळली. केंद्र सरकार कोर्टात इम्पेरीकल डाटा देवू शकत नाही, अशी भुमिका केंद्राने घेतली तसेच या इम्पेरीकल डाटा मधे अनेक चुका असल्याने देता येत नाही, असे म्हटले. यामुळे ओबिसी आरक्षणावर गदा आली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे वारंवार इम्पेरीकल डाटाची मागणी केंद्राकडे केली. यापूर्वीच्या सरकारला देखील राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असुनही हा डाटा देण्यात आला नव्हताच, हे संपुर्ण  ओबीसी  समाजाच्या लक्षात आलेलेच आहे. 
      सुरवातीपासुनच केंद्र सरकारने इम्पेरीकल डाटा न देण्याची भुमिका घेतली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे ओबिसी नेते छगन भुजबळ यांनी वेळोवेळी केंद्र सरकारच्या धोरणावर  टीका करीत ओबीसी आरक्षण मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले आहे. 
              यावर केंद्र सरकारचा ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांंच्या नेतृत्वात आज (दि.१५) ला जनता कॉलेज चौकात निषेध करण्यात आला.
          केंद्र सरकारने संसदेच्या चालू अधिवेशनात जर घटना दुरुस्ती करुन घटनेच्या कलम 243 (D) 6 व 243 (T) 6 मधे दुरुस्ती केली व ओबीसीना 27% आरक्षणाची तरतूद केली तर नेहमीसाठीच ओबीसींना स्थनिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळू शकते, दर 10 वर्षानी इम्पेरीकल डाटा गोळा करण्याची गरजच राहणार नाही. तसेच 2021 मधे ओबीसी जनगणना करावी यासाठीच केंद्राने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन याप्रसंगी केले.
              केंद्र जर आढमुठीची भुमिका घेतच असेल तर राज्य सरकारने विशेष परिस्थितीच्या कायद्याचा वापर करुन, होवू घातलेल्या स्थनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलून तात्काळ निधी व मनुष्यबळ उपलब्ध करुन राज्याचा ओबिसिचा इम्पेरीकल डाटा गोळा करावा व सुप्रीम कोर्टाला द्यावा. तरच ओबीसीचे राजकिय आरक्षण पूर्ववत होईल असे डॉ. जीवतोडे यांनी स्पष्ट केले.
             याप्रसंगी ओबिसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात रवि वरारकर, राष्ट्रीय ओबिसी संघाचे जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, विजय मालेकर, संजय सपाटे, रवि जोगी, डॉ. संजय बर्डे, डॉ. गणेश पेटकर, डॉ. शिवराम सातपुते, विद्या शिंदे, जोत्सना लालसरे, मंजुळा डुडुरे, सरीता कंचेवार, मीनाक्षी मोहितकर, भोयर,  राहुल देशमुख, सुनिल मुसळे, सुखलाल चुधरी, रोशन थेटे, संदिप माशीरकर, शितल पाटील, राखी नवघरे, आदी ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 comments:
Post a Comment