Ads

माझा ट्रॅक्टर मला परत द्या ,ट्रॅक्टर मालकाची पत्रपरिषदेत मागणी


Give me back my tractor
Tractor owner's demand 
भद्रावती,दि.२१(तालुका प्रतिनिधी):-
माझ्या मेहनतीने घेतलेला ट्रॅक्टर मला परत देण्यात यावा, अशी मागणी येथील मंजुषा लेआऊटमधील रहिवासी रामदास शंकर भुसारी यांनी पत्रपरिषदेत केली.
पत्रपरिषदेत रामदास भुसारी यांनी सांगितले की, आपण वेकोलिमध्ये कर्मचारी असून सन २०१८ मध्ये जाईन डीअर ५०४५ कंपनीचा नवीन ट्रॅक्टर शेतीकामासाठी विकत घेतला.दरम्यान,दोन महिन्यांपूर्वी माझा मुलगा अविनाश याच्या सोबत शंकर नावाचा एक तरुण व तोंडाला रुमाल बांधलेला एक तरुण असे दोन इसम माझ्या घरी आले. त्यांनी मला ट्रॅक्टर किरायाने देता का? अशी विचारणा केली असता मी त्यांना ट्रॅक्टर स्वतःच्या शेतीसाठी घेतला आहे.किरायाने देण्यासाठी नाही असे सांगितले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी वरील तीघे जण पुन्हा घरी आले. यावेळी इतर दोघांनी माझ्या मुलाला दारु पाजली होती. त्यामुळे मुलाने ट्रॅक्टर किरायाने देत नसाल तर पहा, अशी मला धमकी दिली. तसेच ३० हजार रुपये महिन्याला किराया द्यायचे कबूल करुन तीघे जण ट्रॅक्टर घेऊन निघून गेले.
त्यानंतर को-या स्टॅम्प पेपरवर माझ्या सह्या घेऊन आपसी विक्रीपत्र लिहुन घेतले. किरायाचे पैसे मिळत नसल्याने आपण आपला ट्रॅक्टर परत घेऊन आलो. तो परत आणत असताना आपणास धक्काबुक्कीही करण्यात आली. असाही आरोप भुसारी यांनी पत्रपरिषदेत केला. त्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर बाहेर नेण्यात आला. तो नेमका कुठे आहे याबाबत आपणास कोणतीही माहिती नव्हती. याबाबत मुलाला विचारणा केली असता त्याने वरोरा तालुक्यातील मौजा मुरदगाव येथील विनोद केशव चांदेकर यांच्याकडे असल्याचे सांगितले.त्यानुसार आपण मुरदगाव येथे जाऊन चांदेकर यांच्याकडे ट्रॅक्टरची मागणी केली असता त्यांनी ट्रॅक्टर परत करण्यास नकार दिला. जोपर्यंत अविनाशला दिलेले २ लाख रुपये मला मिळणार नाही, तोपर्यंत मी ट्रॅक्टर परत करणार नाही अशी भूमिका चांदेकर यांनी घेतली. परंतु आपल्या मुलाने फक्त २५ हजारच रुपये चांदेकर यांच्याकडून घेतले असल्याचा दावा भुसारी यांनी पत्रपरिषदेत केला. जर आपला ट्रॅक्टर आपणास परत मिळाला नाही तर आपण पोलिसांत तक्रार दाखल करु असा इशाराही भुसारी यांनी पत्रपरिषदेत दिला.पत्रपरिषदेला कवडू भुसारी उपस्थित होते.
याबाबत विनोद चांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण अविनाशला २ लाख रुपये दिले असून या घटनेचे ५-६ साक्षीदार आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आपणास वाद वाढवायचा नसून अविनाश,त्याचे वडील यांच्यासोबत बसून वाद मिटवायचा आहे. माझे पैसे मिळाले की मी ट्रॅक्टर परत करणार आहे असे सांगितले. तसेच स्टॅम्प पेपर बद्दल विचारले असता स्टॅम्प पेपरवर जे लिहिले ते अगोदर भुसारी यांना सांगितले होते असेही चांदेकर म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment