Ads

आष्टा येथे नागदिवाली महोत्सवनिमित्त व रियान कारमेंगे यांचे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व तालुका स्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ


A grand blood donation camp on the occasion of Nagdiwali festival and Ryan Carmenge's birthday at Ashta and felicitation ceremony of meritorious students
भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
कोविड 19मुळे राज्याच्या रक्तपेढीत उदभवलेली रक्ताची कमतरता व ती कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी युवा वर्गाला केलेल्या रक्तदानाच्य्या आव्हानाला प्रतिसाद देण्याकरिता रियान हरिष कारमेंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला बहुसंख्य युवकांनी प्रतिसाद दिला. दिनांक 17डिसेंबर 2021ला रियान हरिष कारमेंगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर हे मानिका सभागृह आष्टा येथे घेण्यात आले. शिबिराच्या अध्यक्ष स्थानी ग्राम पंचायत आष्टा चे सरपंच चांगदेव भाऊ रोडे हे होते उद्घाटक म्हणून अलोपथिक दवाखाना चे वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत फुलझेले साहेब होते प्रमुख अतिथी म्हणून सौ बबिता बंडू कारमेंगे ,हरिष कारमेंगे, चीलनकर साहेब, जीलगिरवार मॅडम, संघटनेचे अध्यक्ष महेश सावसाकडे, श्रीकृष्ण कारमेंगे,संजय गावित,रुपेश घुमे,अमोल संतोष पडवे, प्रशांत मांडवकर, मेघश्याम गजभे,चेतन कारमेगे, गजानन कारमेंगे इत्यादी उपस्थित होते तसेच सायंकाळी 5वाजता माणिका ची भव्य रॅली काढण्यात आली त्या रॅलीत गावातील बहुसंख्य लोकांचा सहभाग होता 18डिसेंबर 2021ला तालुका स्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नयन बाबाराव जांभुळे सरपंच ग्राम पंचायत चंदनखेडा हे होते प्रमुख पाहुणे म्हणून देविदास जाभुळे सर जिल्हा अध्यक्ष माना जमात मंडळ, दोहतरे सर तालुका अध्यक्ष माना जमात मंडळ, रविंद्र कारमेंगे सर विद्यार्थी संघटना सल्लागार, विलास पडवे, राजू ढवळे, हे उपस्थित होते. सत्कार समारंभ ला वर्ग 12 वी कला शाखेतून प्रथम क्रमांक. स्नेहल मारोती सावसाकडे. पारोधी , व्दितीय क्रमांक,सविता विजय श्रीरामे आष्टा , वाणिज्य शाखेतून प्रज्वल ईश्वर. सावसाकडे आष्टा, विज्ञान शाखेतून प्रतीक्षा भाउराव दडमल सोनेगाव तू , तसेच 10 वर्गातून प्रथम क्रमांक पायल मारोती सावसाकडे. कोकेवाडा तू , द्वितीय क्रमांक रूपाली गजानन सावसाकडे कोकेवाडा तू यांना. शिल्ड व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला .. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकेश कारमेंगे यांनी केले संचालन पवन कारमेंगे यांनी केले व आभार अरविंद बारेकर यांन केले. कार्यक्रमाच्य्या यशस्वीतेसाठी ईश्वर सावसाकडे,राजू कारमेंगे,बंडू कारमेंगे, गुणवंत कारमेंगे, बंडू भरडे, शरद ननावरे,मधुकर कारमेंगे परेश बारेकर , पियूष बारेकर विद्यार्थी युवा मंडळ,. तसेच आष्टा गावकरी. यांनी. विशेस सहकार्य केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment