चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अतिरिक्त निधी रु. १० हजार करोड मंजूर केला असल्याची माहिती लोकसभेत खासदार बाळू धानोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली. या व्यतिरिक्त मागणीनुसार यात वाढ केल्या जाऊ शकते असेही केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिह यांनी सांगितले.
मनरेगा हा रोजगार कार्यक्रम असून प्रत्येक आर्थिक वर्षात आवश्यकतेनुसार राज्यांना निधी वितरित केल्या जातो. मनरेगा अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात उर्वरित कालावधी साठी अतिरिक्त निधी प्रदान करण्यात आला आहे काय ? असा प्रश्न लोकसभेत खासदार बाळू धानोरकर यांनी विचारला होता. चालू आर्थिक वर्षात सन २०२१- २२ मध्ये १५.१२.२०२१ च्या स्थितीनुसार देशभरातील राज्यांना मिळून एकंदर ३०३२.४९ कोटी रुपये पाठविण्यात आल्याचेही मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना हक्काचे काम मिळण्याची हमी फक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून मिळत असते. प्रत्येकांच्या हाताला काम असे या योजनेचे ध्येय आहे. त्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्राला मिळण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आग्रही आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी आल्यास राज्यातील प्रत्येकाला कोरोना काळानंतर हाताला काम उपलब्ध होणार आहे.
0 comments:
Post a Comment