र्पोभुर्णा :-र्पोभुर्णा तालुक्यातील वेळवा येथे १६ डिसेंबर रोजी संध्या विलास बावणे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला. या घटनेनंतर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतक संध्या बावणे यांच्या शोकाकुल कुटूंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन केले. भारतीय जनता पार्टी परिवार पुर्णपणे सोबत असल्याची ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयांना आ. मुनगंटीवार यांनी आर्थिक मदत केली
आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन. प्रविण यांना घटना स्थळावरुन दुरध्वनी द्वारे संपर्क साधत मृतकाच्या कुटूंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याच्या सुचना दिल्या. त्याच प्रमाणे मृतकाच्या कुटूंबातील मुलगा आणि मुलीला त्वरित रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सुचना सुध्दा दिल्या. या परिसरातील वाघाचा धुमाकुळ थांबविण्याच्या दृष्टीने त्वरित पिंजरे बसवावे व वाघाला जेरबंद करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्या अशा सुचना देखिल आ. मुनगंटीवार यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिल्या. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम आदींची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment