चंद्रपूर :- मराठी बाणा बहुउद्देशिय सामाजिक संस्था व मित्रा परिवारच्या वतीने भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रमीक कार्ड उपलब्ध करून दिले जाईल असे सांगीतले होते. त्यानुसार दि. 15 डिसेंबर 2021 रोजी माझा वार्ड - माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत रघुवीर अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अष्टभुजा वार्डातील 477 मजुर वर्गातील गरीब नागरीकांना ई-श्रमीक कार्डचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात मराठी बाणा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामजी हरणे, भाजपा ओबीसी मोर्चाचे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, कमल स्पोर्टींग क्लबचे शहर उपाध्यक्ष महेश अहीर, कृष्णा कुंडू, अनिता हरणे, रंजना उमाटे, रवि बागडे, गजानन उरकुडे व अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांनी सांगीतले की मा. प्रधानमंत्राी नरेंद्र मोदीजी यांनी सबका साथ, सबका विकास या भूमिकेतून गोरगरीबांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवून त्या योजनांचा लाभ संबंधीत लाभाथ्र्यांपर्यंत अतिशय नियोजनबध्दरित्या पोहोचविला आहे. याच योजनांतील ई-श्रमीक कार्ड ही अत्यंत लाभकारी योजना असून असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान उंचावणारी अशी ही योजना आहे.
या योजनेकरीता देशभरात एक कोटीहून अधिक कामगारांनी नोंदणी केली असून या योजनेच्या माध्यमातून संबंधीत कामगारांना रोजगारा बरोबरच भविष्यात अनेक लाभ उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. असंघटीत कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची ही महत्वकांक्षी योजना असल्याचेही रघुवीर अहीर यांनी सांगीतले.
या योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब गरजुंपर्यंत पोहोचविण्याचा मानस मराठी बाणा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
Home
chandrapur
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांचे शुभहस्ते 477 लोकांना ई-श्रमीक कार्डचे वितरण
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment