Ads

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर सचिव अडकला खंडणीच्या गुन्ह्यात.


NCP's Chandrapur city secretary caught in ransom case
चंद्रपूर : महिन्याभरापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती वाहन चोरीचा गुन्हात अडकली. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन झाली. या प्रकरणाचा अद्याप विसर पडलेला नसतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर सचिव खंडणीचा गुन्हात अडकला. आरटीओकडून ३५ हजार रूपये घेतांना त्याला सायबर सेलचा पथकांनी शुक्रवारला अटक केली. नयन साखरे असे अटकेत असलेल्या पदाधिकार्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस कार्यवाही सूरू होती.

साखरे याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला शहर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. पद मिळाल्यापासून त्याने येथील आरटीओ कार्यालयात धुमाकूळ घालणे सुरु केले. अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणणे. भ्रमणध्वनीवर चित्रीकरण करणे आदी त्यांचे उद्योग तो करायचा. तुमची वरिष्ठांकडे तक्रार करणार माध्यमांत बातम्या छापून आणणार, असाही तो दम भरायचा. हे सर्व थांबवायचे असेल तर पन्नास हजार रुपये महिना द्यावा लागेल, असा दम त्याने आरटीओ अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, साखरेच्या त्रासाला कंटाळून सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधिकक्षकांची भेट घेतली. त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षकांनी याचा तपास सायबर सेलकडे दिला. दुसरीकडे अधिकाऱ्यांशी पन्नास हजार रुपये महिन्यावरून त्याच्या वाटाघाटी सुरुच होत्या. शेवटी ३५ हजार रुपये महिना देण्याचे ठरले. पहिला हप्ता घेण्यासाठी साखरे शुक्रवारी आरटीओ कार्यालयात आला. पैसे स्वीकारतानाच त्याला सायबर सेलच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पथकाने शुक्रवारी अटक केली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment