चंद्रपुर :- दारूच्या नशेत बेधुंद युवकाचे चारचाकी भरधाव धावणाऱ्या वाहनांवरून नियंत्रण सुटल्याने बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाखाली वाहन कोसळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये चार युवका पैकी एक युवक जागेवरच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी व एक जखमी आहे.
चार युवक एका खाजगी कामानिमित्त चंद्रपूर वरून काम आटपून सायंकाळी ४-३० वा दरम्यान दारू पिऊन आपल्या चार चाकी वाहनाने बल्लारपूर कडे येत असताना भरधाव धावणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलावरून चार चाकी वाहन ( एम एच ३४ बी आर ०१४१) खाली कोसळले त्यामध्ये अभिषेक गुप्ता (२२) रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर हा जागेवरच ठार झाला तर रोहित सुभाष तोगरवार(२१) व मोहन सल्लारेडी (२१) रा.बालाजी वार्ड बल्लारपूर, हे गंभीर जखमी झालेत व भुवन गजभिये (२१) रा.राजुरा हा जखमी झाला. वाहन खाली कोसळल्यावर एका युवकाच्या हातात दारूच्या बाटल्या दिसल्या असे प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली यावरून ते अत्यंत बेधुंद अवस्थेत वाहन चालवत होते असे दिसून येते. चंद्रपुर सिटी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटना स्थळी पोहोचले व जखमींना तात्काळ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलवले वृत्त हाती येईपर्यंत दोघांची प्रकृती गंभीर असून एका युवकाला किरकोळ जखमी असल्याने सुट्टी देण्यात आली.One killed, two injured in four-wheeler crash under Babupeth railway flyover
About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment