Ads

वं. राष्ट्रसंतांचा ५३ वा पुण्यतिथी महोत्सव विविध कार्यक्रम व उपक्रमाने साजरा होणार

भद्रावती तालुका प्रतिनिधी:-वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५३ वा पुण्यतिथी महोत्सव यंदा दि. २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२१ पर्यंत विविध कार्यक्रम व उपक्रमाने लोकमान्य विद्यालयाचे प्रांगणात साजरा करण्यात येत आहे.
महोत्सवात महिला संम्मेलन, राष्ट्रीय किर्तन, राष्ट्रसंत व्याख्यानमाला, भजन संमेलन, गोपालकाला , नाटिका, परिसंवाद व चित्रकला स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २४ डिसेंबर शुक्रवारला सकाळी ५.३० वाजता श्री शेषानंद पांडे महाराज यांच्या हस्ते श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी ठीक ९.०० वाजता विद्यार्थ्यांचा परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसंवादात महाविद्यालयीन विभाग अध्याय क्रमांक ११ ग्राम रक्षण व हायस्कुल विभाग अध्याय क्रमांक २३ सणोत्सव हे विषय ठेवण्यात आले आहे . दुपारी ३ ते ५.३० भजन संमेलन, रात्रौ ७ वाजता श्री अरविंदजी राठोड गुरुकुंज आश्रम याची *'भजने लोक सेवा होय'* या विषयावर व्याख्यानमाला तसेच रात्रौ ८ वाजता राष्ट्रसंताची खंजेडी भजने व खंजेडी जुगलबंदी कार्यक्रम श्रीजय चव्हाण व चमु, गुरुकुंज आश्रम सादर करतील. दिनांक २५ डिसेंबर रोज शनिवारला दुपारी १२ वाजता सौ. बेबीताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलनाचा कार्यक्रम होईल. महिला संमेलनात सुश्री स्नेहगंगाश्रीजी श्रुंगारे, आळंदी यांचा किर्तनाचा कार्यक्रम होत असुन निर्मलाताई खडतकर, कविता ताई येणुरकर, अँड. सारिका जेनेकर, पोउपनि अश्विनी वाकडे, ज्योतीताई लालसरे यांचे विविध विषयावर मार्गदर्शन होईल तसेच रात्रौ ६.३० वाजता हभप मनोज महाराज चौबे, नांदुरा यांचे व रात्रौ ८ वाजता सप्तखंजेरी वादक तुषार सुर्यवंशी यांचे राष्ट्रीय किर्तनाचा कार्यक्रम होईल. दिनांक २६ डिसेंबर रोज रविवारला सकाळी ७ वाजता रामधुन मार्गदर्शन रामदासपंत चोरोडे गुरुजी दासटेकडी, दुपारी १२ वाजता किर्तन व गोपालकाला सादरकर्ते हभप श्री प्रशांत महाराज ठाकरे, अकोला, दुपारी २. ३० वाजता दिवंगत कार्यकर्त्यांना श्रध्दांजली, निराधारांना सहायता मदत व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता आदरणीय श्री आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, हंसराज भैय्या अहिर पुर्व गृहराज्यमंत्री भारत सरकार, सौ. प्रतिभाताई धानोरकर आमदार भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्र, लक्ष्मणराव गमे उपसर्वाधिकारी अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, सेवकराम मिलमिले पंढरपुर यांचे मार्गदर्शन होईल. रात्रौ ठिक ८ वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म युवा मंच, भद्रावती निर्मीत *'ग्रामनाथ...... विश्वाचे अधिष्ठान'* हि नाटीका सादर करण्यात येईल.

पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा वर्ग १ ते ४ विषय ग्रामगीता अध्याय १ ला देवदर्शन व ग्रामगीता अध्याय २३ वा सणोत्सव, वर्ग ५ ते ९ करीता ग्रामगीता अध्याय १४ वा ग्राम आरोग्य व ग्रामगीता अध्याय २८ वा प्रार्थना व विश्वधर्म, वर्ग १० ते खुला गट ग्रामगीता अध्याय २९ वा दलित सेवा व ग्रामगीता अध्याय १९ वा जीवन शिक्षण या तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. दिलेल्या गटात कोणत्याही एका विषयावर ए फोर साईज ड्रॉईंग शीट मध्ये चित्र काढणे अनिवार्य राहील. चित्र दिनांक २४ डिसेंबर २०२१ ला सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत भ्रमणध्वनी क्रमांक ७२१८१५८०९० , ९८५०४९२४०४ यावर संपर्क करून चित्र जमा करावे. महोत्सवा प्रसंगी निराधारांना सहायता मदत करण्यात येणार आहे. राष्ट्रसंताच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमीत्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीच्या वतीने करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment