Ads

घरफोडी करणाऱ्या आरोपींना भद्रावती पोलिसांनी ठोकल्या बेड्या


Accused of burglary was handcuffed by Bhadravati police
भद्रावती (तालुका प्रतिनिधी ):-
फिर्यादी रंजना गुजरकर, रा फुकट नगर, भद्रावती यांनी दिनांक १३.१०.२०२१ रोजी पो स्टे ला तक्रार दिली की, दिनांक १३.१०.२०२१ चे १०.०० ते १६.०० वा दरम्यान ते कुटूंबासह कामाने बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने घराचा लॉक काढुन आंत प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे ८ ग्रॅम चे टॉप्स, बि-या व बदामी अंगठी व नगदी ५००० रू चोरून नेले आहे.

दिनांक २०.१२.२०२१ रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन बातमी मिळाली की, आरोपी रूपेश उर्फ हनीसिंग भैयाजी किन्नाके, वय २४ वर्षे व शंकर हरीदास परचाके, वय २४ वर्षे दोन्ही रा फुकट नगर, भद्रावती यांनी मिळुन चोरी केली आहे. त्यावरून सदर आरोपीचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आली असुन गुन्हयात चोरी केलेला मुददेमाल ३०,६२० रू त्यांचेकडुन जप्त करण्यात आलेला आहे

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा., अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी सा., उप वि. पोलीस अधिकारी आयुष नोपानी सा, यांचे मार्गदर्शनात पो. नि. गोपाल भारती, गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार , नापोशि/ जगदिश झाडे, नापोशि/ विश्वनाथ चुदरी व पोकॉ / शशांक बदामवार यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment