Ads

होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारा ,आमदार किशोर जोरगेवार यांचे आवाहन

Set up a well-equipped study room for budding students Appeal of MLA Kishor Jorgewar
चंद्रपूर : विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे. स्वतःचे पर्यायाने समाजाचे नाव उंचवावे, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. शासकीय निधी चांगल्या कामासाठी खर्च व्हावा, ही आपली भूमिका आहे. त्यामुळे अभ्यासिकेसाठी गतवर्षी ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोनामुळे अजूनही जागेचा शोध संपलेला नाही. त्यामुळे तातडीने जागेचा शोध घ्यावा. पुन्हा १० लाखांचा निधी देणार आहे. यातून समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात यावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समितीद्वारे पुरस्कृत धनोजे कुणबी समाज मंडळातर्फे दोनदिवसीय राज्यस्तरीय धनोजे कुणबी उपवर-वधू ऑनलाइन परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील समाजाच्या सभागृहात रविवारी (ता. २६) समारोप झाला. यावेळी आमदार जोरगेवार बोलत होते. अध्यक्षस्‍थानी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्‍हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर उपस्‍थित होते.
आमदार जोरगेवार पुढे म्हणाले, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ११ अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्याचा आपला मानस आहे. आजघडीला चार अभ्यासिकांचे बांधकाम सुरु झाले आहे. उर्वरित अभ्यासिका लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यातील एक धनोजे कुणबी समाजाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या अभ्यासिकेसाठी एकूण ६० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यासोबतच समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात यावे. यासाठीसुद्धा निधी उपलबध करून देणार आहे.
यावेळी मेळाव्‍याच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य करणारे प्रा. विजय मुसळे, शुभम डाखरे व सूरज डाखरे यांचा मान्‍यवरांच्या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला. संचालन प्रा. नामदेव मोरे यांनी, तर आभार विनायक धोटे यांनी मानले. या सत्रानंतर उपवरवधूंचा परिचय मेळावा पार पडला. यात मोठ्या संख्येने उपवर-वधू सहभागी झाले होते.
---------------
शेतकरी मेळाव्यासाठी पुढाकार घ्या
शेतकरी हा समाजातील महत्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे हा घटक जगला, तर सर्व समाज जगेल. त्यामुळे शेतकरी मेळावे घ्यावे. यातून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात यावे. जेणेकरून शेतकरी आधुनिक पद्धतीने पीक घेईल. यासाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्याची आपली तयारी आहे. जळगाव येथील इरिगेशनचे मी स्वतः पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना तेथून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना स्वखर्चातून पाठविण्याची आपली तयारी असल्याचेही आमदार जोरगेवार म्हणाले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment