Unveiling of oil painting of revered Baba-Tai at Mookbadhir Vidyalaya
वरोरा प्रतिनिधी :-26 डिसेंबर श्रद्धेय बाबा आमटे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध महारांगोळीकार, आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवनचे कलाशिक्षक श्री.प्रल्हाद ठक यांनी काढलेल्या बाबा व ताई यांच्या तैलचित्राचे अनावरण व भारत जोडो अभियानाचे सहयोगी माजी प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे लातूर यांनी केले.

या प्रसंगी महारोगी सेवा समितीचे सचिव मा.विकासभाऊ आमटे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव मा. माधव बागवे, म.से.स. चे विश्वस्त डाॅ.विजय पोळ, सुधाकर कडू व आनंदवनाचे ज्येष्ठ कार्यकर्ता कविश्वर काका,संधिनिकेतनचे अधिक्षक श्री. रवींद्र नलगिंटवार, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सेवाग्राम बांगडकर, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय भसारकर, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.काळे ,आनंदवनाचे युवा कार्यकर्ता श्री. राजेश ताजने ,आनंदवनचे उपसरपंच श्री.शौकत खान व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवनचे सामाजिक कार्यकर्ता गुलाब शेंडे , ज्येष्ठ शिक्षक श्री दीपक शिव, वाचाउपचार तज्ज्ञ श्री. रविकांत घोलप अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे याप्रसंगी सहकार्य लाभले. हे सुंदर व बोलके तैलचित्र आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवन येथे मुख्याध्यापक कार्यालयात लावण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment