Ads

दिव्यांग बांधवांसाठी सेवा केंद्र सुरु करणार - आ. किशोर जोरगेवार .

Will start a service center for the disabled - MLA
चंद्रपुर :- दिव्यांग बांधवांना दैनदिन जीवनात येत असलेल्या अडचणींची मला कल्पना आहे. त्यांचे जीवनमान उंचवावे या दिशेनेही माझे प्रयत्न सुरु आहे. त्यांना येणा-या अडचणी सोडविण्याला मी प्राधाण्य देत असून दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा या करीता येत्या काळात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिव्यांग सेवा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
दिव्यांग दिना निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात दिव्यांग बांधवांचा व त्यांचा सांभाळ करणा-या त्यांच्या कुटुंबाचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यंग चांदा बिग्रेडच्या दिव्यांग विभागाच्या प्रमूख कल्पना शिंदे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष निलेश पाझारे, जेष्ठ दिव्यांग तरुन तिवारी, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, मुन्ना खोब्रागडे आदि मान्यवरांची मचांवर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना ते म्हणाले कि, दिव्यांग बांधवांसाठी शक्य ते उपक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना सायकल, व्हिल चेअर वाटपही केल्या गेले आहे. तसेच त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारातून आर्थिक प्रगती करता यावी या करिता आपण बस स्थानक तसेच मुख्य चौकाच्या ठिकाणी मागेल त्याला हातठेला हा उपक्रम राबविणार आहोत. याकरिता दिव्यांग बांधवांनी जागा निश्चीत करावी असेही ते यावेळी म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना कार्यन्वीत आहे. मात्र सदर योजनेच्या माहिती अभावी त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांची ही अडचण लक्षात घेता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आपण दिव्यांग बांधवांसाठी सेवा केंद्र सुरु करणार आहोत. या सेवा केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना येणा-या अडचणी सोडविल्या जातील तसेच विविध शासकीय योजनांची माहिती या केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाईल पात्र दिव्यांग बांधवांना सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही हे केंद्र काम करेल असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात भाग्येश्री कोलते, लक्ष्मी कुमरे, अंड्स्कर, कैलाश ब्राम्हणे, निलेश पाझारे, नितीन खोब्रागडे, आलिया शेख, मुन्ना खोब्रागडे, शिवशंकर कोकते, वनमाला ठाकरे, अविनाश कोरेकर, कार्तीक खडसे, शितल सातपूते आदि दिव्यांग बांधवांचा शाल, श्रिफळ, पूच्छपूच्छ व सन्मानचिन्ह देउन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कल्पना शिंदे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर दर्शना चाफले यांनी अभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रविंद्र उपरे, सचिन फुलझेले, सतिश मुल्लेवार, अर्पीत चैधरी, उत्तम साव, पंकज मिश्रा, मंगेश ढोले, रंजिता बिस्वास, किरण करमनकर आदिंनी परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment