ब्रम्हपुरी :-तालुक्यातील तुलानमेंढा या गावात श्री.संकेत सुरेश कावळे यांच्या गोदामात मोठ्या लांबीचा अजगर आढळून आल्याने गावात एकच खडबड उडाली आहे. सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी येथील सर्पमित्र श्री ललित उरकुडे व वृषभ राऊत यांनी गावकऱ्यांकडून मिळाल्याबरोबर क्षणाचाही विलंब न करिता दोन्ही युवक घटनास्थळी दाखल झाले व अथक प्रयत्नानंतर मोठ्या अजगरला पकडून वनरक्षक श्री शेंदूरकर व वनरक्षक श्री टेकाम यांच्या निगराणीत सुरक्षित स्थळी अजगराला सोडून जीवनदान देण्यात आले. अजगर हा 9.2ft लांब असून त्याचे वजन 14kg होते..बचाव कार्यात प्राश खोब्रागडे आणि गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment