भद्रावती,दि.२९(तालुका प्रतिनिधी):-
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधी योजनेअंतर्गत भद्रावती तालुक्यातील ५० महिला बचतगटांना दरीपंजी आणि फाॅगिंग मशीनचे नुकतेच वाटप करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्या अर्चना जीवतोडे, जि.प.सदस्य यशवंत वाघ, प्रवीण सूर, पं.स.सभापती प्रवीण ठेंगणे, संवर्ग विकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, बोबडे, विस्तार अधिकारी कापकर, खोब्रागडे, सर्व महिला बचतगटांचे अध्यक्ष, सचिव, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटांनी दरीपंजीचा वापर महिला सभा व महिलांचे कार्यक्रम यासाठी करुन बचत गट सक्षम करावे असे आवाहन याप्रसंगी केले.
0 comments:
Post a Comment