Ads

युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी अमर गोंडाने यांची नियुक्ती

चंद्रपुर:-अमर गोंडाने हे वर्धा जिल्ह्यातील पारडी या ग्रामीण भागातील रहिवाशी असून शेतकरी पुत्र आहे. त्याच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच महाराष्ट्र युवक काँग्रेस चे प्रदेश प्रवक्ता मिडल्याचे बोलले जात आहे.
आधी समाजिक संघटनेत काम करत असतांना जिथे जिथे अन्याय अत्याचार झालेला पीडित होता त्यांची भेटिगाठी घेऊन सात्वन करणे,त्याचा पाठीशी खंबीर उभे राहून, पीडिता साठी कायदेशीर लढा देणे हा त्यांचा प्रवास. काँग्रेस पक्ष्याच्या वतीने "यंग इंडिया के बोल" या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले गेले होते त्यात प्रत्येक राज्यातून पाच असे स्पर्धक या प्रमाणे देशभरातून 300 स्पर्धक निवडण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री अजय मकान, इम्रान प्रतापगधी,अल्का लांबा,पवन खेरा,गौरव वल्लभ,रागिणी नायक,जयवीर शेरगील,पवन झा आदींनी पंच परीक्षक म्हणून भूमिका बजावली. भारतीय युवक काँग्रेस चे राष्ट्रीय प्रभारी कृष्णाजि अल्लावरुजी, राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी बी.व्ही. ,राष्ट्रीय महासचिव सीताराम लांबा, हरपाल सिंग,मनीष चौधरी युवक काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता संजीवजी शुल्का यांच्या सर्वांनुमते महाराष्ट्र प्रवक्ता पदी अमर गोंडाने यांची निवड करण्यात आली. यांचं मूळ गाव पारडी त. कारंजा घा. जिल्हा वर्धा आहे. या येशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment