Ads

करंजी येथे दुचाकीचा अपघात एक ठार; एक जखमी

गोंडपीपरी प्रतिनिधी:– तालुक्यातील करंजी येथे आज दि.29 जानेवारी रोज शनिवारला सांयकाळी 5 वाजताच्या दरम्यान दुचाकीने Two Wheeler बॅरिकेटस ला जोरदार धडक दिल्याने सदर अपघात झाला.
यात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
म्रुतकाचे नाव रविंद्र उर्फ रवी खाडे वय 57 वर्ष रा.कोठारी याचा मृत्यू झाला असून संदीप उर्फ बालु लोनगाडगे रा,कोठारी वय 39 वर्ष हा जखमी झाला आहे. जखमीच्या हातात दुखापत झाली आहे.
ते दोघे दुचाकी वाहनाने गोंडपीपरी येथून कोठारीला जात होते. दुचाकीस्वार खाडे तर संदीप मागे बसून होता.
करंजी येथे लावलेल्या बॅरिकेट ला दुचाकीने जोराची धडक दिल्याने ते दोघे ही कोसळले
घटनेची माहिती होताच गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरु घटनास्थळी हजर झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले असता
रवी खाडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृतक हा कोठारी ग्रामपंचायत चा माजी उपसरपंच असल्याची माहिती आहे.
पुढील तपास गोंडपीपरी पोलिस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment