घुग्घुस : येथील चंद्रपूर - पुणे महामार्गावरील राजीव रतन चौक रेल्वे गेट परिसरात उड्डाणपूलाचे कार्य युद्धस्तरावर शुरू असल्याने
याठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते.
दिवसातून जवळपास पंधरा ते वीस वेळा रेल्वे फाटक बंद राहत असल्याने वाहनांची मोठी रीघ लागते.
अपघात - भांडण तंटे वाढत असल्याने याठिकाणी चोवीस तास ट्राफिक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी किसान काँग्रेस तर्फे निवेदनातून ठाणेदार बी.आर.पुसाटे याना करण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,लखन हिकरे,प्रेमानंद जोगी,प्रशांत सारोकर, स्वागत बुरचुंडे,शंकर कामत्वार आदीने केली आहे
0 comments:
Post a Comment